corona hotspot 
मुंबई

कल्याण-डोंबिवलीकरांच्या चिंतेत भर, 'हे' आहे कोरोनाचे 10 'हॉटस्पॉट'

सकाळवृत्तसेवा

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केडीएमसी प्रशासन समाजमाध्यमांतुन नागरिकांशी संवाद साधत आहे. रविवारी केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शहरातील कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून जवळपास 10 परिसरांची नावे घोषित केली.

डोंबिवली पूर्वेतील म्हात्रेनगर, आयरेगाव, तुकाराम नगर, छेडा रोड, डोंबिवली पश्चिमेतील टेलकोसवाडी, रेतीबंदर रोड, कल्याण पूर्वेतील भगवान नगर, चिंचपाडा, कल्याण पश्चिमेतील वायलेनगर, खडकपाडा या परिसरात मोठ्या संख्येने कोरोना बाधित आढळले असून हे परिसर हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आले आहेत. 

शहरातील एकूण रुग्णसंख्या 73 झाली असून त्यातील 49 रुग्ण हे डोंबिवलीतील आहे. तर 26 रुग्ण हे उपचाराअंती बरे झाले असल्याचेही सूर्यवंशी यांनी सांगितले. तर गेल्या दोन दिवसात सापडलेले 12 रुग्ण हे कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आले असून पालिका प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणात संशयित म्हणून त्यांची तपासणी केली होती. या तपासणीतूनच हे रुग्ण सापडल्याचे नमूद करत संपर्क हा किती धोकादायक असू शकतो याबाबतचे गांभीर्यही त्यांनी अधोरेखित केले. 

या परिसरात आढळले रुग्ण
आतापर्यंत आढळलेले 73 रुग्ण हे गांधारी, टिटवाळा गणेश मंदिर, शहाड, फ्लॉवर व्हॅली, चिकणघर गावठाण, गरिबाचा वाडा, गावदेवी मंदिर नवागाव, ठाकूरवाडी, कोपर गाव,  म्हात्रे नगर, सारस्वत कॉलनी, अंबिका नगर, तुकाराम नगर, नेहरू नगर, जाई बाई विद्यामंदिर, विजय नगर, तिसगाव गावठाण, सागाव, सोनारपाडा या परिसरातील आहे.

Kalyan-Dombivlikar worries, Corona's 10 hotspots

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

VSI Land Approval: जालन्यात व्हीएसआयला अतिरिक्त जमिनीला शासनाची मंजुरी; सौरऊर्जा प्रकल्प, पंपगृह व ऊस रोप निर्मिती उपक्रमांना वेग

Pune Civic Alert: अमित शहांच्या पुणे दौऱ्यापूर्वी महापालिका सतर्क; ताफ्याच्या मार्गावरील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT