mla ganpat gaikwad banner
mla ganpat gaikwad banner sakal
मुंबई

Dombivali News : कल्याण पूर्वेत भाजपकडून बॅनरबाजी; आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी पुन्हा एकदा चर्चेत

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - कल्याण पूर्वेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याहस्ते अनावरण करण्यात येत आहॆ. शिवसेनेकडून या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली असून दुसरीकडे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यावतीने लावण्यात आलेल्या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या बॅनरमुळे आमदार गायकवाड यांच्या पत्नी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. या बॅनरवर या स्मारकासाठी आमदारांनी केलेला पाठपुरावा त्याची कागदपत्रे यांसह भाजप नेत्यांचा फोटो झलकविण्यात आला आहे. मात्र मुख्यमंत्री आणि शिंदे गटातील नेत्याचे फोटो टाकणे भाजपने टाळले आहे.

कल्याण पूर्वेतील महापालिकेच्या ५/ड प्रभाग क्षेत्र कार्यालयाच्या परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकातील पूर्णाकृती पुतळयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते अनावरण करण्यात येणार आहॆ.

यासाठी पालिका प्रशासन व शिवसेनेच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहरात जागोजागी बॅनर देखील लावण्यात आले आहेत. मात्र या बॅनर मध्ये भाजपचे बॅनर मात्र लक्ष वेधून घेत आहेत. आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी हे बॅनर लावले आहेत. यावर हे स्मारक आणि पूर्णाकृती पुतळयासाठी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पाठपुरावा केला आहॆ.

बॅनरवर केलेल्या पत्रव्यवहाराचे फोटो भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा फोटो, आमदार यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांचा फोटो आहॆ. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री कपिल पाटील, कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण यांचा फोटो सुद्धा आहॆ.

तर मुख्यमंत्री शिंदे आणि शिवसेना नेत्याचे फोटो लावले नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा या बॅनरची चर्चा होऊ लागली आहे. बॅनरच नाही तर राजकारणात सक्रिय होत असलेल्या आमदार गायकवाड यांच्या पत्नी सुलभा यांच्या नावाची देखील जोरदार चर्चा होत आहे.

भाजप आमदार गायकवाड हे सध्या गोळीबार प्रकणात न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र त्यांच्या मतदारसंघात त्यांच्या पत्नी उतरल्या असून त्या मतदारसंघ पिंजून काढत आहेत. यामुळे शिवसेनेला काटे की टक्कर या मतदारसंघातून दिली जात असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा वाद काय वळण घेतो, की वरिष्ठ हा वाद क्षमविण्यात यशस्वी हातात हे पहावे लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंब्य्रातील बाबाजी पाटील विद्यालयात मतदान सुरूच

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT