Kalyan  sakal
मुंबई

Kalyan: आगरी कोळी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा, आमदार विश्वनाथ भोईर यांची मागणी

Vidhansabha Adhivetion: राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून त्यामध्ये अर्थसंकल्पीय चर्चेवर बोलताना आमदार भोईर यांनी ही मागणी केली.

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

Agri Koli Samaj News: मुंबईत ठाणे, रायगड जिल्ह्यातील आगरी कोळी समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. येथील आगरी कोळी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आगरी कोळी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी अशी मागणी कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली आहे.

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून त्यामध्ये अर्थसंकल्पीय चर्चेवर बोलताना आमदार भोईर यांनी ही मागणी केली.

ठाणे, रायगड आणि मुंबई परिसरात पूर्वीपासूनच मोठ्या संख्येने आगरी कोळी समाजाचे वास्तव्य आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये विविध विकासकामे आणि विकास प्रकल्पासाठी शासनाकडून त्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.

या जमिनींअभावी आगरी कोळी समाजासमोर उत्पन्नाच्या साधनाचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याचे आमदार भोईर यांनी सभागृहात सांगितले. या पार्श्वभूमीवर इतर सामाजिक महामंडळांच्या धर्तीवर आगरी कोळी समाजासाठी विशेष असे आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून त्यासाठी अर्थसहाय्य करण्याची आग्रही भूमिका आमदार भोईर यांनी अधिवेशनात मांडली आहे.

म्हणून हवे आहे हे आर्थिक विकास महामंडळ...

विद्यमान महायुती सरकारने आताच्या काळात विविध समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन केली आहेत. त्या धर्तीवर आगरी कोळी समाज बांधवांसाठीही आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे.

जेणेकरून प्रकल्पासाठी शेतजमीन गेलेल्या, शेतजमीन नसल्याने उदरनिर्वाहाचे साधन नसल्याने समाजातील सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न, विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचा प्रश्न, महिला बचत गटांना आर्थिक मदत उपलब्ध करून देणे, भागीदारी पद्धतीने संविधानिक संस्थांसह अभियांत्रिकी, कृषी आदी व्यावसायिक संस्था स्थापन करून त्यासाठी हे आगरी कोळी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे आवश्यक असल्याची गरज आमदार भोईर यांनी या अधिवेशनात अधोरेखित केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात, मानाचे गणपती मार्गस्थ, गणेश भक्तांचा उत्साह

BCCI Sponsorship 2025 : नव्या प्रायोजकातून बीसीसीआय ४०० कोटींहून अधिक कमवणार? नेमका प्लॅन काय?

Ladki Bahin Scheme : 'या' कारणामुळे ‘लाडकी बहीण’ ठरणार अपात्र, नवा नियम काय सांगतो

Pune Rain : पुणे परिसरात आज पावसाचा अंदाज; बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता

Red - White Onion: लाल आणि पांढरा कांदा खाताय? हे नक्की वाचाचं

SCROLL FOR NEXT