मुंबई

कल्याण फूलबाजार रंगीबेरंगी फुलांनी सजला 

सकाळ वृत्तसेवा

टिटवाळ : गणपती उत्सवाची धामधूम सर्वत्र सुरू आहे. बाप्पा घरी येणार म्हणून मखर सजावटीसोबत, विद्युत रोषणाई करून बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज झालेल्या गणेशभक्तांनी बाप्पाच्या पूजेला लागणाऱ्या रंगीबेरंगी, सुवासिक फुलांच्या खरेदीसाठी रविवारी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमधील घाऊक बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने हा बाजार फुलून गेला होता. 

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील फूलबाजार मध्यवर्ती ठिकाणी आहे. येथे कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, मोहना, शहापूर, भिवंडी, कसारा, उल्हासनगर येथून नागरिक मोठ्या संख्येने फुले खरेदी करण्यासाठी येत असतात. गुलाब, शेवंती, मोगरा, लाल गोंडा, पिवळा गोंडा, लाल चेरडा, अष्टर, छोटा झेंडू, गुलछडी, गुलाब, जरबेरा, लिली आदी फुलांना मोठी मागणी असल्याने फूलबाजारामध्ये मोठी गर्दी उसळली होती. 

पूजेला लागणारी फुले, हार, बेलपत्र, दुर्वा, केवडा आणि तुळशीपत्र स्वस्त आणि ताजी मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणून कल्याण बाजार समितीच्या आवारातील फूलबाजाराची ओळख आहे. रविवारी एका दिवसात तब्बल 50 टन फुलांची विक्री झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. गणपतीला लागणाऱ्या लाल फुलांच्या हारांची किमत दोनशेहून अधिक होती; तर केवड्याची पात 40 ते 100 रुपयांपर्यंत विकल्या जात होत्या. पावसामुळे फुलांची आवक कमी झाल्याने या घाऊक मार्केटमध्येही फुलांची दरवाढ झाल्याने ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर दिसत होता. 

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील फूलबाजार सध्या पडक्‍या शेडमध्ये सुरू आहे. सण-उत्सवाच्या काळात येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होते. येथे अद्ययावत मार्केट झाल्यास फुलांची निगराणी व्यवस्थित करता येईल. 
- भाऊ नरोडे, अध्यक्ष 
फूलबाजार मार्केट आवार 

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील फूलबाजार मध्यवर्ती ठिकाणी असल्याने नागरिक सण-उत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. त्यांना सोई-सुविधा देण्यासाठी बाजार समिती नियोजनबद्ध काम करीत आहे. पावसामुळे आवक कमी झाल्याने फुलांचे भाव चढे आहेत. 
- कपिल थळे, सभापती 
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PMC Budget 2026 : पीएमपी तिकिटात ज्येष्ठांना ५०% सवलत, महिलांसाठी खास योजना; पुणे महानगरपालिकेचा १५ हजार ६६९ कोटींचा अर्थसंकल्प सादर

IPL 2026 Marathi News: काव्या मारनच्या संघात ३००+ विकेट्स घेणारा खेळाडू दाखल; KKRनेही विदर्भच्या पोट्ट्यासाठी मोजले लाखो

Latest Marathi News Live Update : दीपक केसरकर यांच्या विरोधात सावंतवाडीत मोर्चा

Yoga For Travel: लांब फ्लाइटमध्ये थकवा आणि अंगदुखी त्रास देतायत? मग ५ मिनिटांचा ‘इन-फ्लाइट योगा’ नक्की ट्राय करा!

Australia Cricket: खेळपट्टी तयारीत लुडबुड नसणार; आर्थिक फटका बसल्यानंतर ऑस्ट्रेलियन मंडळाचा पवित्रा

SCROLL FOR NEXT