Durgadi Fort Sakal
मुंबई

Dombivali News : कल्याणचा ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला खासगी संस्थेच्या नावावर करण्याचा डाव उघडकीस

कल्याण येथील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याच्या जागेवर दावा करणारे तसेच किल्लाची जागा खाजगी संस्थेच्या नावावर करण्याचा घाट घालण्यात आल्याचा प्रकार कल्याण मध्ये उघडकीस आला आहे.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - कल्याण येथील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याच्या जागेवर दावा करणारे तसेच किल्लाची जागा खाजगी संस्थेच्या नावावर करण्याचा घाट घालण्यात आल्याचा प्रकार कल्याण मध्ये उघडकीस आला आहे. या कामासाठी चक्क तहसीलदार कार्यालयाच्या बनावट कागदपत्रे व शिक्क्यांचा वापर करण्यात आला असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी महसूल खात्यातील मंडळ अधिकारी प्रीती घुडे (वय 45) यांच्या तक्रारी वरून सुयश शिर्के सातवाहन याच्या विरोधात महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किल्ले दुर्गाडी हा ठाणे जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारीत आहे. माळशेज घाट वनक्षेत्र आणि पर्यटन स्थळ विकास समितीचे अध्यक्ष असलेले सुयश शिर्के सातवाहन याने कल्याण तहसील कार्यालयाकडे अर्ज केला होता. या अर्जानुसार त्याने एका जमीनीच्या उताऱ्यावर ना हरकत दाखल मागितला होता. हा अर्ज जिल्हाधिकारी ठाणे कार्यालयाकडे चौकशीकरीता गेला. त्याठिकाणाहून चौकशी होऊन तो कल्याण तहसील कार्यालयास प्राप्त झाला.

कल्याण तहसील कार्यालयात मंडळ अधिकारी प्रिती गुडे यांनी या प्रकरणी या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे की, ज्या जागे संदर्भात शिर्के सातवाहन याने अर्ज केला होता. त्याठिकाणी किल्ले दुर्गाडी आहे. किल्ले दुर्गाडीच्या जागेवर दावा सांगणाऱ्या शिर्के सातवाहन याने सादर केलेली कागदपत्रे ही साक्षांकित नव्हती.

12 सप्टेंबर 2022 ते दिनांक 2 नोव्हेंबर 2023 या कालावधीत शिर्के यांनी मौजे कल्याण येथील कब्जेदार दुर्गाडी किल्ला असे नावे दाखल असलेल्या सर्व्हे नंबर 338 (एकूण क्षेत्र 1-16-00 हेक्टर आर) ही जमीन समितीच्या नावावर दाखल करण्यासाठी 26 जून 2014 रोजी अर्ज दिला होता. सदर अर्जासोबत अर्जदाराने काही कागदपत्रे जोडली होती. या कागदपत्रांमध्ये दुर्गाडी किल्ल्याचा 7/12 उतारा, फेरफार याचाही समावेश होता.

हा किल्ला माळशेज, नाणेघाट आणि इतर वनक्षेत्र आणि पर्यटनस्थळ विकास समितीच्या नावे असलेले 8 मे 2021 तारखेचे पत्र जोडण्यात आले होते. महसूल खात्यातील अधिकाऱ्यांनी या पत्राचे बारकाईने निरीक्षण केले असता सदर पत्र बनावट असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. मात्र वैज्ञानिक पद्धतीने निरीक्षण केले असता तहसीलदारांच्या नावाच्या बनावट लेटरहेडची कागदपत्रे बनवून त्यावर तहसीलदार कार्यालय प्रमुखाची बनावट स्वाक्षरी आणि शिक्के तयार करून ते लेटरहेडवर उमटवले.

ही सर्व कागदपत्रे तहसील कार्यालयात दाखल करून ऐतिहासिक वारसा असलेल्या दुर्गाडी किल्ला क्षेत्राच्या अभिलेखामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करून शासनाची फसवणूक केल्याचे मंडळ अधिकारी प्रिती घुडे यांनी त्यांच्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Hit And Run : गणपती पेठेत ‘हिट अँड रन’चा थरार, चार पोलिसांसह अकरा जखमी; नशेतधुंद कार चालकास जमावाने तुडवले

Rohit Shetty House Firing Case : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबारप्रकरणी पुण्यातून पाचजण ताब्यात, गॅंगस्टर बिश्नोई टोळीशी संबंधाचा संशय

Baramati Crime News : बारामतीत चोरटयांनी 25 लाखांचे दागिने केले लंपास; अजित पवार यांच्या अंत्यविधीप्रसंगी चोरटयांचा धुमाकूळ....

Latest Marathi News Union Budget 2026: आज देशात विदेशात कुठं काय घडलं?

Shirur News : पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची दोन मुलांसह विहिरीत उडी; शिक्रापूर पोलिसांनी पतीला अटक

SCROLL FOR NEXT