VIdeo Viral  Sakal
मुंबई

Kalyan News : शिवाजी चौकात KDMT बस आणि रिक्षाची धडक; जखमी महिलेशी बसचालकाचे उद्धट वर्तन | Video Viral

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी चौकात रविवारी सायंकाळी केडीएमटी च्या बसची आणि रिक्षाची धडक झाली. यामध्ये एक महिला किरकोळ जखमी झाली आहे. महिला तसेच नागरिकांनी केडीएमटी बसचालकाला याबाबत विचारणा केली असता त्याने महिला आणि नागरिकांशी उद्धट वर्तन करत हुज्जत घातली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बसचालक आणि नागरिक यांच्यातील गोंधळामुळे शिवाजी चौकात अर्धा तास वाहन कोंडी झाली होती. अखेर इतर नागरिकांच्या मध्यस्थीने हा वाद मिटवत वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ही वाहतूक सुरळीत सुरु केली.

कल्याण पश्चिमेतील शिवाजी चौकात रविवारी सायंकाळी 7 च्या सुमारास भिवंडी कडे जाणाऱ्या केडीएमटी बसची आणि एका रिक्षाची धडक झाली. या अपघातात एक महिला किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे.

जखमी महिला बसचालकाला ओरडून सांगत असतानाही बसचालकाने गाडी न थांबता पुढे नेत असल्याने संतप्त प्रवाशांनी बस थांबवली. याप्रकरणी बसचालकाला प्रवाशांनी विचारणा करता बसचालकाने त्यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली.

रिक्षा चालकासह प्रवाशांवर हा बसचालक अरेरावीच्या भाषेत बोलत होता. बस चालकाच्या उद्धट वर्तनामुळे संतप्त प्रवाशांनी रस्त्यात गोंधळ घातल्याने चौकात अर्धा तास वाहन कोंडी झाली होती. वाहतूक पोलिस याठिकाणी नसल्याने वाहने खोळंबली होती.

घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बस पुढे रवाना करत येथील वाहतूक सुरळीत सुरु केली. या अपघातात कोणतीही हानी झालेली नाही. मात्र केडीएमटी बसचालकांचा दिवसेंदिवस वाढत असलेल्या उर्मटपणा मुळे नागरिक हैराण आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने विक्रमांचा पाऊस पाडला, पण आपला कुलदीप यादव कमी नाही पडला; नोंदवला जबरदस्त पराक्रम...

Latest Marathi News Live Update : आदित्य ठाकरे आणि संजय राऊत ठाण्यातील पोलीस स्टेशनमध्ये दाखल

Mohol Agriculture: अप्रोल मिळाला तरी पीक नोंद गायब! सॉफ्टवेअरच्या अडचणीने मोहोळच्या शेतकऱ्यांची कर्जासाठी धावपळ

Nitin Gadkari Ethanol News : ई-२० नंतर आता शंभर टक्के इथेनॉलवर धावणाऱ्या वाहनांवर भर; नितीन गडकरींची मोठी घोषणा

कीर्तनातून प्रसिद्ध झालेल्या तरुणीची भन्नाट गोष्ट; ‘पाच फुटाचा बच्चन’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता

SCROLL FOR NEXT