Kalyan Lok Sabha 2024 esakal
मुंबई

Kalyan Lok Sabha 2024: कल्याणमध्ये शिवसेनेच्या गटांत रस्सीखेच; श्रीकांत शिंदेंच्या विरोधात मविआला तगडा उमेदवार मिळेना?

Kalyan Lok Sabha 2024: शिवसेना शिंदे गटालाच मिळण्याची शक्यता असली तरी भाजपनेही उमेदवारीसाठी कंबर कसली आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर ताकत राखणे ही या दोन्ही गटांची प्राथमिकता राहणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Kalyan Lok Sabha 2024: कल्याण लोकसभा मतदारसंघ २००९ च्या फेररचनेनंतर अस्तित्वात आला. २०१९च्या निवडणुकीत डॉ. श्रीकांत शिंदे ३,४४,३४३ एवढ्या मोठ्या मताधिक्क्याने दुसऱ्यांदा विजयी झाले. राज्यात दोन वर्षांपूर्वी शिवसेनेतील फुटीनंतर झालेल्या सत्तांतरात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि त्यांचे पुत्र असलेल्या श्रीकांत शिंदे यांना मोठे महत्व प्राप्त झाले. आता ही जागा महायुतीतील शिवसेना शिंदे गटालाच मिळण्याची शक्यता असली तरी भाजपनेही उमेदवारीसाठी कंबर कसली आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर ताकत राखणे ही या दोन्ही गटांची प्राथमिकता राहणार आहे.

२०१९ चे चित्र

बाबाजी पाटील (राष्ट्रवादी) मते : २,१५,३८०

डॉ. श्रीकांत शिंदे (शिवसेना) विजयी मते : ५,५९,७२३

संजय हेडावू (वंचित बहुजन आघाडी) मते : ६५,५७२

नोटा मते : १३,०१२

विजयी उमेदवारांचे मताधिक्य : ३,४४,३४३

वर्चस्व

२००४ : ---

२००९ : शिवसेना

२०१४ : शिवसेना

२०१९ : शिवसेना

सद्य:स्थिती

शिंदे गटाकडून विद्यमान खा. श्रीकांत शिंदे हॅट्‌ट्रिक करण्याच्या तयारीत

महायुतीतील भाजपनेही हिंदुत्ववादी मतांवर डोळा ठेवून केला दावा

शिवेसेनेच्या ठाकरे गटाचीही तयारी, उद्धव ठाकरेंचे विशेष लक्ष

हे मुद्दे प्रभावी ठरणार

शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने दोन्ही गटांचे ‘कल्याण’ सुभ्याकडे विशेष लक्ष

मराठा आरक्षणाचा मुद्दा तापल्याने समाजाची भूमिका महत्वाची

आगरी समाज मतदारसंघात प्रभावी. तो ओबीसीत येतो. त्याची भूमिका महत्वाची.

श्रींकात शिंदे यांनी विकासकामे चांगल्या रीतीने केल्याने त्यांना फायदा होण्याची शक्यता

भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण शिंदेवर नाराज असल्याने त्यांच्या भूमिकेकडे लक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT