mahavikas aghadi candidate vaishali darekar sanjay raut charioteer sulbha gaikwad sakal
मुंबई

Kalyan Loksabha Election : महाविकास आघाडीच्या उमेदवार दरेकर यांच्या सारथी बनल्या सुलभा गायकवाड

शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे आज कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले आहेत.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे आज कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले आहेत. अंबरनाथ तालुक्यातील गोरपे गावात ते उमेदवार वैशाली दरेकर यांच्यासोबत उपस्थित झाले असता गावात त्यांचे जंगी स्वागत झाले.

यावेळी राऊत व दरेकर यांच्या गाडीच्या फ्रंट सीटवर बसलेल्या भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी सर्वांचेच लक्ष वेधले. ठाकरे गटाच्या उमेदवार दरेकर यांच्या प्रचारासाठी गायकवाड यांनी कंबर कसली आहे का ? त्या त्यांच्या सारथी झाल्या आहेत का? अशी एकच चर्चा आता रंगू लागली आहे.

अंबरनाथ तालुक्यातील गोरपे गावात एका कार्यक्रमानिमित्त शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत मंगळवारी आले होते. तत्पूर्वी नेवाळी नाका येथे उमेदवार वैशाली दरेकर, शिवसेना उपनेते अल्ताफ शेख, कल्याण शहर प्रमुख शरद पाटील, हर्षवर्धन पाटील यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी यांच्या वतीने राऊत यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

त्यानंतर कल्याण ग्रामीण मधील गोरपे गावात देखील जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण करत त्यांचे स्वागत करण्यात आहे. यावेळी राऊत यांच्या गाडीच्या फ्रंट सीटवर बसलेल्या महायुतीतील कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या उपस्थित होत्या. त्यांनी साऱ्यांचेच लक्ष वेधले.

याआधी देखील कल्याण मधील नववर्ष स्वागत यात्रेत वैशाली दरेकर यांची भेट घेत सुलभा यांनी त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर आता चक्क दरेकर यांच्या प्रचारातच सुलभा गायकवाड त्यांच्या सोबत दिसल्याने गायकवाड यांनी दरेकर यांच्या सारथी झाल्याचे पहायला मिळाले. यामुळे महायुती उमेदवाराच्या विरोधात असलेल्या उबाठा च्या वैशाली दरेकर यांच्या प्रचारासाठी गायकवाड यांनी कंबर कसली आहे का? अशी ही चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान नेवाळी नाका येथे नेते संजय राऊत यांना प्रसार माध्यमांनी संवाद साधला...

राऊत यांनी दोनच दिवसापूर्वी श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. काही लोकांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांना उपचाराची गरज आहे. उपचाराचा खर्च आम्ही देणार असा खासदार शिंदे यांनी पलटवार केला होता. त्यांच्या या टिकेला राऊत यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

जनतेच्या लूटीचा पैसा बोलतोय

त्यांच्याकडे लुटलेले एवढे पैसे आहेत. कालच मी प्रकरण काढलेला आहे. हा लुटीचा पैसा बोलतोय जनतेच्या लुटीचा पैसा. आमच्या शिवसेनेकडे उत्तम आरोग्य व्यवस्था आहे. तुमच्या व्यवस्थेची आम्हाला गरज नाही. आम्ही जे प्रश्न उपस्थित केले त्याचे उत्तर द्या. श्रीकांत शिंदे फाउंडेशन कडे पैसे कोणाकडून येतात. एवढे उत्तर द्या मग बघू कोणावर उपचार करायचे असा टोला राऊत यांनी लगावला आहे.

शिवसेनेचे प्रचार गीत प्रदर्शित करण्यात आले. या गीतावर शिवसेना शिंदे गटाने आक्षेप घेतला आहे. त्यावर राऊत यांनी सांगितले आहे की, धनुष्यबाण हा तुमचा आहे का? याचे आत्मचिंतन करा. ठाकरेकडून लॉन्च करण्यात आलेले गीत सुरुच राहणार असे सांगितले.

संजय राऊत येण्यापूर्वी नेवाळी परिसरात जमलेल्या ठाकरे गटाच्या पदाधिकार् यांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या. याबाबत राऊत यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, दोन महिने थांबा त्याचे उत्तर दिले जाईल. राऊत यांच्या या टिकेला आत्ता शिंदे गटाकडून काय प्रतिउत्तर दिले जाते हे पाहणे महत्वाचे ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: भारताला विजयाची संधी, पण पाऊस थांबणार कधी? शेवटच्या दिवशी खेळ झाला नाही तर काय, जाणून घ्या

'पुन्हा तोच बसस्टॉप' तेजश्री दिसणार जुन्या स्टॉपवर, फोटो शेअर करत म्हणाली, 'तेच ठाणे, तेच ठिकाण आणि तेच तुम्ही..'

Manmad News : मनमाड बाजार समितीच्या अडचणींवर मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘सर्जिकल स्ट्राइक

Crime: मुंबईत धक्कादायक प्रकार! आधी गळा दाबून मारलं, नंतर ग्रॅनाइट मशीनने पत्नीचा शिरच्छेद अन्...; विक्षिप्त पतीचं कृत्य

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

SCROLL FOR NEXT