crime saal
मुंबई

Kalyan: झोपेची गोळी दिली नाही, मेडिकलमधील विक्रेत्याला पिता पुत्राची मारहाण

Crime: पोलीस उपनिरीक्षक गणेश मुसळे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

Dombivli: मेडिकल स्टोअर मध्ये विक्रेत्याकडे झोपेची गोळी त्यांनी मागितली. मात्र दुकानात झोपेची गोळी नाही असे विक्रेत्याने सांगताच याचा राग आल्याने पिता पुत्रांनी मेडिकल मधील विक्रेत्याला बेदम मारहाण केल्याची घटना खोणी पलावा येथे घडली आहे.

याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात मेडिकल मधील विक्रेता अजय स्वामी (वय 32) यांच्या तक्रारीवरुन दिपक करोडिया (वय 54) व त्यांचा मुलगा दर्शन करोडीया (वय 32) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिपक हे खोणी पलावा फेज 2 मध्ये लेकसाईड मध्ये राहण्यास आहेत. लेकशोर ग्रीन मधील संजीवनी मेडिकलमध्ये सोमवारी रात्री 10.30 च्या सुमारास दिपक हे मुलासह हे गेले होते. दुकान बंद करण्याची वेळ झाली होती.

तेवढ्यात तेथे काम करणाऱ्या अजय यांच्याकडे दिपक यांनी झोपेची गोळी मागितली. त्यांच्याजवळ डॉक्टरांची औषधाची चिठ्ठी नव्हती, तरीही ते गोळी मागत होते. यावेळी अजय याने दुकानात झोपेची गोळी नाही असे सांगितले. याचा राग दिपक यांना आल्याने त्यांनी अजयला शिविगाळ करत हाताच्या चापटीने मारहाण केली.

त्यानंतर दिपक व दर्शनने दुकानात शिरुन तेथे असलेल्या वायपरने अजयला बेदम मारहाण केली. या मारहाणीत अजय यांना दुखापत झाली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक गणेश मुसळे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT