Kalyan sakal
मुंबई

Kalyan: चार वर्षांपासून फरार असलेल्या अमली पदार्थ तस्कराला पोलीसांनी केली अटक, वाचा कसा रचला सापळा

Crime Update: अंमली पदार्थांविषयीच्या गुन्ह्यांची उकल सैफच्या अटकेने होण्याची शक्यता असून पोलिस त्या अंगाने तपास करत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Drug Crime Latest Udpate: अंमली पदार्थांची तस्करी करणारा आरोपी गेल्या चार वर्षापासून कल्याण बाजारपेठ पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार होत होता.

परंतू या तस्कराच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सापळा रचत बुधवारी बाजारपेठ पोलिसांनी या तस्करला अटक केली आहे. सैफ सिकंदर बुरहान (वय ३८) असे अटक तस्कराचे नाव आहे.

ठाणे येथील राबोडी परिसरात राहणारा सैफ हा मॅफेड्रोन (एम.डी.) या अंमली पदार्थांची तस्करी करायचा. चार वर्षांपूर्वी अंमली पदार्थ तस्करीप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी सैफ विरुध्द गुन्हा दाखल केला होता.

त्याला याप्रकरणात अटक करण्यासाठी पोलिसांनी तयारी केली असतानाच, तो कल्याण शहर परिसरातून फरार झाला होता. पोलिस ठाणे, मुंबई, रायगड परिसरात त्याचा शोध घेत होते मात्र तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटून जात होता.

बाजारपेठ पोलिस ठाण्याचे हवालदार सचिन साळवी यांना अंमली पदार्थ तस्करीतील आरोपी सैफ बुरहान हा कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ येणार असल्याची माहिती गुप्त बातमीदारांमार्फत मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेशसिंग गौड यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ रुपवते, या पथकाचे सुरेश पाटील, हवालदार सचिन साळवी, हवालदार प्रेम बागुल, अरूण आंधळे यांच्या पथकाने बाजार समिती इमारत परिसरात सापळा लावला.

सैफ हा बाजार समिती आवार परिसरात येताच सापळा लावून बसलेल्या पोलिसांनी त्याच्यावर झडप घालून त्याला अटक केली. पोलिसांच्या जाळ्यात अडकलो आहोत, याची चाहूल लागताच त्याने पोलिसांच्या तावडीतून निसटण्याचा प्रयत्न केला.

पण पोलिसांनी त्याला जागीच जेरबंद केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ रूपवते या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. अंमली पदार्थांविषयीच्या गुन्ह्यांची उकल सैफच्या अटकेने होण्याची शक्यता असून पोलिस त्या अंगाने तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात, मानाचे गणपती मार्गस्थ, गणेश भक्तांचा उत्साह

BCCI Sponsorship 2025 : नव्या प्रायोजकातून बीसीसीआय ४०० कोटींहून अधिक कमवणार? नेमका प्लॅन काय?

Ladki Bahin Scheme : 'या' कारणामुळे ‘लाडकी बहीण’ ठरणार अपात्र, नवा नियम काय सांगतो

Pune Rain : पुणे परिसरात आज पावसाचा अंदाज; बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता

Red - White Onion: लाल आणि पांढरा कांदा खाताय? हे नक्की वाचाचं

SCROLL FOR NEXT