मुंबई

Kalyan Murder: पोलिसांची मोठी कारवाई, 24 तासाच्या आत 'त्या' दोघांना केली अटक

Crime Update: कल्याण गुन्हे शाखेने दोघांना नाशिकहून केली अटक : तीघांचा शोध अद्याप सुरु

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

100 feet Rode Murder Kalyan: कल्याण पूर्वेत 26 वर्षीय संदिप राठोड याची सोमवारी सायंकाळी भर रस्त्यावर हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कल्याण गुन्हे शाखा याचा समांतर तपास करत असताना यातील आरोपी हे नाशिक जिल्ह्यातील इगतपूरी रेल्वे स्थानकात येणार असल्याची माहिती मिळाली. गुन्हे शाखेने नाशिक येथे सापळा रचून शैफ उर्फ साहिल नसीर शेख (वय 21) व विद्यासागर तुलसीधरण मुर्तील उर्फ अण्णा (वय 21) यांना अटक केली. यातील तीघांचा शोध सुरु आहे.

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत 100 फुटी रोड, हाजीमलंग रोडलगत सोमवारी सायंकाळी पाच जणांनी धारदार शस्त्राने वार करत एका तरुणाची हत्या केली होती. संदिप राठोड असे मयत तरुणाचे नाव असून भर रस्त्यात संदिपच्या डोक्यावर, खांद्यावर, पोटावर व पाठीवर चॉपरने वार करत त्याला गंभीर जखमी करत त्याची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात प्रेम विनोद चव्हाण याच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याचा समांतर तपास कल्याण गुन्हे शाखेकडून करण्यात येत होता. कल्याण गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक संदिप चव्हाण, संतोष उगलमुगले, सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक दत्ताराम भोसले, रमाकांत पाटील, अनुप कामत, विलास कडु, मिथुन राठोड, गुरुनाथ जरग यांचे पथक काम करत होते. हत्येची घटना सीसीटिव्ही मध्ये कैद झाली होती.

यातून आरोपी निष्पन्न करीत गुप्त बातमीदारांकडून त्यांची माहिती गोळा केली. यावेळी यातील संशयीत आरोपी हे इगतपुरी रेल्वे स्टेशन येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी आरोपी येण्याआधीच तेथे सापळा रचला. यात शैफ व अण्णा या दोघांना ताब्यात घेण्यात आले. चोवीस तासाच्या आत पोलिसांनी दोघांना अटक केली असून अद्याप तिघांचा शोध सुरु आहे.

त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता दोघांनी कबुली देत सांगतले की, त्यांचे संदिप याच्यासोबत पूर्वी भांडण झाले होते. संदिप सोबत पूर्व वैमनस्य असल्याने त्यांनी व त्यांच्या साथीदारांनी संदिप याच्यावर हत्याराने वार करुन त्यास ठार केले. या दोन्ही आरोपींना कोळसेवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वर्ल्ड कपसाठी भारतात आलेल्या ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंची छेडछाड, आरोपीला अटक; नेमकं काय घडलं?

Ladki Bahin Yojana: महिलांसाठी लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी प्रक्रिया सुलभ करावी : इम्तियाज जलील

Marathwada Rain: मराठवाड्यात बरसल्या सरी; नांदेड, जालना परिसरात मुसळधार पाऊस

Government Farmer Scheme: महत्त्वाची बातमी! ९७ हजार शेतकऱ्यांना मिळाले ११२ कोटी; आठवड्यात ७ लाख ६४ हजार शेतकऱ्यांच्‍या खात्‍यात जमा होतील ८६७ कोटी रुपये

Farmers Protest: शेतकऱ्यांचा पाच तास ‘रास्ता रोको’; कन्नडमध्ये आंदोलन, टोमॅटोचे दर कोसळल्याने आक्रमक भूमिका

SCROLL FOR NEXT