kalyan news  sakal
मुंबई

Kalyan Politics: दिव्यातील भाजप पदाधिकाऱ्यांचा पक्षश्रेष्ठींकडून "पचका" होणार

कल्याण लोकसभेची उमेदवारी शिवसेनेच्या डॉ. श्रीकांत शिंदेनाच मिळणार - अँड.आदेश भगत, शिवसेना उपशहरप्रमुख

सकाळ वृत्तसेवा

Diva News: कल्याण लोकसभेत भाजपच्या कमळ चिन्हाशिवाय उमेदवार निवडून येऊ शकत नाही अशी फुशारकी मारणाऱ्या दिवा भाजपने आपल्या कुवती प्रमाणे व्यक्तव्य करावीत, असा जोरदार टोला शिवसेना दिवा शहराचे उपशहर प्रमुख अँड. आदेश भगत यांनी लगावला आहे.

प्रसारमाध्यमांच लक्ष वेधण्यासाठी आणि आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी दिवा भाजप असले तथ्यहीन दावे करत असल्याचे मत भगत यांनी व्यक्त केले आहे. दिवा शहरात शिवसेनेचे कार्य मोठे आहे आणि प्रचंड जनसंपर्क देखील आहे.

त्यामुळे दिवा शहरात प्रचाराच्या संपूर्ण प्रक्रियेत भाजपकडे दुर्लक्ष केल जाईल, या भीतीने दिवा भाजपचे पदाधिकारी केवळ लक्ष वेधण्यासाठी असल्या तथ्यहीन मागण्या करत असून ही बाब भाजप पक्षश्रेष्ठींना देखिल माहिती असल्याने तेही यांच्या मागणीकडे दुर्लक्षच करतील, असा ठाम विश्वास अँड आदेश भगत यांनी व्यक्त केला आहे.

वास्तविक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा कामाचा आवाका आणि प्रचंड जनसंपर्क लक्षात घेता त्यांच्या तोडीस कोणत्याही पक्षाकडे सांगायला आता उमेदवार शिल्लक नाही. मागील लोकसभा निवडणुकीत लाखांच्या फरकाने जिंकणारे डॉ. श्रीकांत शिंदे यावेळी महाराष्ट्रात सर्वात विक्रमी मताने जिंकणारे उमेदवार असतील यात शंका नाही.

दिवा शहरात कुणी कितीही आदळ - आपट केली तरीही दिवा शहरातून पडलेल्या एकूण मतदानाच्या ८०% पेक्षा जास्त मतदान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना म्हणजेच 'धनुष्यबाण' या चिन्हाला मिळेल, असा आत्मविश्वास आम्हाला असल्याचे अँड.आदेश भगत यांनी म्हटले आहे.

डॉ. शिंदेंची काम करण्याची पद्धत स्वतःच्या विभागातील समस्या सोडवणे असो वा त्या समस्यांसाठी निधी मंजून करून घेणे असो वा विभागातील समस्या ठामपणे संसदेत मांडले असो हे त्यांनी नेहमी केलेले आहे.

तर हा कल्याण लोकसभा मतदारसंघांमध्ये विकासाचा वेगळा पॅटर्न राबवणारे खासदार शिंदे लोकसभेतही सर्वच कामकाजात सहभाग घेत असल्यामुळे त्यांच्या याच कामगिरीवरून यंदाचा 2024 पुरस्कार डॉ. शिंदे यांना देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्याला सलग चौथ्या दिवशी पावसानं झोडपलं, तासाभरात रस्त्यांना नद्यांचं स्वरुप; काही ठिकाणी गारपीट

Talwar Baba: भयंकर! तंत्र-मंत्र आणि भीतीचा खेळ... महाराष्ट्रातील ‘तलवार बाबा’चा काळा चेहरा उघड; 'असं' करायचा शोषण

Samruddhi Expressway Accidents : काय आहे 'हायवे हिप्नोसिस'? समृद्धीवर का होतायत अपघात? पूल ठरतात धोकादायक!

Latest Marathi News Live Update : पुण्यात पावसाचा जोर ओसरला

RSS आणि बाबरी मस्जिद प्रकरणाचा अखेर उलगडा होणार, संजय दत्त समोर आणणार इतिहासाचा ‘आखरी सवाल’

SCROLL FOR NEXT