Kalyan Politics sakal
मुंबई

Kalyan Politics: आमदार गणपत गायकवाड यांच्या भावाच्या कार्यालयाची तोडफोड!

चार ते पाच जणांनी मिळून कार्यालयाची तोडफोड करत कार्यालयामधील काही कर्मचाऱ्यांना केली मारहाण...

शर्मिला वाळुंज

Kalyan News: कल्याण पूर्वेतील परिसरातील भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे बंधू माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड यांच्या कल्याण तिसाई चौक परिसरातील जरीमरी व्हिजन या कार्यालयाची चार ते पाच जणांनी तोडफोड केल्याची घटना घडली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार गाडी पार्किंगच्या वादातून चार ते पाच जनाच्या टोळीने कार्यालयात शिरून कार्यालयाची तोडफोड करत कार्यालयामध्ये उपस्थित कर्मचाऱ्यांना देखील बेदम मारहाण केली.(ganpat gaikwad News)

याप्रकरणी कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू असल्याची पोलिसांनी माहिती दिली असली तरी कल्याण पूर्वेतील राजकीय घटना पाहता हे राजकीय वाद नाहीं ना? सवाल उपस्थिती केला जात आहॆ... त्यामुळे हा प्रकार नक्की काय हे अंतिम तपासात समजेल. अशी माहीती पोलिस निरिक्षक सुनील गवळी यांनी दिली.

कल्याण पूर्व मतदार संघातील जवळील द्वारली येथील जागेच्या वादातून हिललाईन पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या केबीनमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता.

या खळबळजनक घटनेनंतर आमदार गायकवाड यांच्यासह तीन जणांना अटक करन्यात आली. त्यानंतर अन्य दोन जणांना अटक केली. या पाचही जणांना १४ दिवसाांची पोलिस कोठडी देण्यात आली. १४ दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

मात्र आता गायकवाड यांच्या भावाच्या ऑफिसची तोडफोड झाल्याने पुन्हा एकदा याला राजकीय वळण लागण्याची शकत्या आहे. मात्र पोलीस सूत्रांनी माहिती दिल्या नुसार यात राजकीय वाद नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र कल्याण पूर्वेतील मागच्या काही महिन्यातील घटना पाहता, पोलीस करतात तरी काय सवाल उपस्थिती केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT