kalyan railway police arrested three person for steal money theft case crime mumbai sakal
मुंबई

Mumbai Crime : कल्याण रेल्वे स्टेशनवर झोपलेल्या प्रवाशांचे साहित्य चोरून व्हायचे पसार; तिघे पोलिसांच्या जाळ्यात

कल्याण रेल्वे स्टेशन परीसरात गुन्हेगारीचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. चोरी, लूटमारीच्या घटनांनी तर स्टेशन परिसर चर्चेत

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - कल्याण रेल्वे स्टेशन हे जंक्शन असल्याने येथे नेहमीच प्रवाशांची वर्दळ असते. स्टेशन परिसरात झोपलेल्या प्रवाशांना हेरून त्यांच्या शेजारी झोपण्याचे नाटक करत त्यांच्या जवळील किंमती माल ते चोरायचे.

गेल्या काही दिवसांपासून चोरीचे असे सत्र सुरू असल्याने रेल्वे पोलिसांनी सापळा रचत तीन सराईत चोरांना अटक केली आहे. गुलाम अजगर शेख, जुनेद हुसेन खान उर्फ शाहरुख अब्रार खान, करण आण्णासाहेब गायकवाड अशी अटक आरोपींची नावे आहेत.

कल्याण रेल्वे स्टेशन परीसरात गुन्हेगारीचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. चोरी, लूटमारीच्या घटनांनी तर स्टेशन परिसर कायम चर्चेत असतो. या स्थानकातून लांब पल्याच्या गाड्यांची देखील ये जा सुरू असल्याने प्रवासी स्टेशन परीसरात गाड्यांची वाट पहात असतात. काही प्रवासी तर येथेच वामकुक्षी देखील काढतात.

या संधीचा फायदा घेत काही सराईट चोरट्यानी झोपलेल्या प्रवाशांना लक्ष करण्यास सुरवात केली. झोपलेल्या प्रवाशांना हेरून त्यांच्या बाजूला झोपण्याचे नाटक ते चोरटे करायचे. झोपेत असणाऱ्या प्रवाशांच्या खिशातील मोबाईल, पैसे काही मौल्यवान वस्तू ते चोरायचे.

याप्रकरणी जास्त तक्रारी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल होऊ लागल्या. पोलिसांनी तपास केला असता काही चोरटे अशी चोरी करत असल्याची माहिती त्यांना मिळाली. पोलिसांनी स्टेशन परिसरातच सापळा रचून तिघा चोरट्यांना अटक केली.

गुलाम अजगर शेख, जुनेद हुसेन खान उर्फ शाहरुख अब्रार खान, करण आण्णासाहेब गायकवाड अशी अटक आरोपींची नावे आहेत. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT