Malang Gad sakal
मुंबई

Kalyan: मलंगगडावर 8 ठिकाणी दरड कोसळण्याची भीती, 40 कुटुंबांना नोटिसा

Malang Gad कल्याणच्या श्री मलंगगडावर बेकायदा बांधकाम मोठ्या प्रमाणात वाढली आहेत

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

Thane Rain: अंबरनाथ तालुक्यातील श्री मलंगडावर दरड कोसळून एकाचा मृत्यूची झाल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेनंतर वाडी ग्रामपंचायत प्रशासन सतर्क झाले आहे. मलंगडावर 8 ठिकणी दरड कोसळण्याची भीती असून त्याठिकाणी सूचना फलक लावत ग्रामपंचायतीने तब्बल 40 कुटुंबांना नोटीसा धाडल्या आहेत.

मुसळधार पावसात गडावर अजूनही काही ठिकाणी दरड कोसळण्याची भीती असल्याने प्रशासनाने सतर्कता बाळगण्यास सुरुवात केली आहे.

अंबरनाथ तालुक्यातील कल्याणच्या श्री मलंगगडावर बेकायदा बांधकाम मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. गडावर अतिक्रमण करत घर बांधून नागरिक तेथे रहात आहेत.

गडावर दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. आता नागरी वस्ती थेट डोंगराच्या कडेला आली असल्याने दरड कोसळून त्यात कोणी गंभीर जखमी तर कोणाला आपले प्राण गमवावे लागले आहेत.

गडावर मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात पाऊस पडतो. त्यामुळे दरड कोसळण्याची शक्यता सर्वाधिक या परिसरात असते. नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाल्याचे चित्र दिसून आले आहे.

अंबरनाथ तालुक्यातील वाडी ग्रामपंचायती कडून दरड प्रवण क्षेत्रात राहणाऱ्या कुटुंबांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. वाडी ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक विजय बडे यांनी याबाबत सांगितले की, गडावरील 7 ते 8 ठिकाणी दरड कोसळण्याची भीती आहे. त्या अनुषंगाने आम्ही त्या परिसरारील 40 कुटुंबांना नोटीसा दिलेल्या आहेत.

मात्र वन विभागाच्या जमिनीवर सुरू असलेली अतिक्रमण वेळीच पाडली जात नसल्याने या परिसरात मोठया प्रमाणात वस्ती वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या नोटीशी नंतर आता नागरिकांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: 'जंतर-मंतर'चा इतिहास काय? आंदोलनाचं ठिकाण कधीपासून बनलं, त्यापूर्वी काय व्हायचं; आता तीन पर्याय कोणते?

Shivsena UBT Leader Resign: ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्यानं तडकाफडकी दिला राजीनामा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

सर, मला अन् मित्राला वडा पाव हवाय; शाळकरी मुलाची विनंती, तुकाराम मुंढे काय म्हणाले ऐका... Video Viral

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT