डोंबिवली : कल्याण-शीळ रोडचे (kalyan shil road) सहा पदरीकरणाचे काम सुरू आहे. काही ठिकाणी कल्वर्टचे काम बाकी असल्याने तेथील काम शिल्लक आहे. रस्त्याच्या या अर्धवट कामामुळे एका चारचाकी गाडीचा शनिवारी पहाटे अपघात (vehicle accident) घडला. हा अपघात एवढा भीषण होता की गाडी दूरवर फेकली जाऊन चक्का चुराडा झाला आहे. गाडीचा चालक यामध्ये गंभीर जखमी (driver injured) झाला आहे. या अपघातामुळे रस्त्यांच्या अर्धवट तसेच (Road work problem) संथगतीने सुरू असलेल्या कामाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
कल्याण शीळ रोडवरून कल्याण दिशेला निघालेल्या चारचाकी गाडीचा पहाटेच्या सुमारास पांडुरंग वाडी नजीक अपघात झाला. या भागात रस्त्याचे काम अर्धवट असून तेथे कंत्राटदाराने लोखंडी पत्रा लावला होता. मात्र हा पत्रा लक्षात न आल्याने गाडी पत्र्यावर धडकून गटारात जाऊन पडली. रस्त्याच्या बाजूला एका दुकानात सूरज भारद्वाज हे झोपले होते. गाडीच्या आवाजाने त्यांना जाग आली व त्यांनी त्या दिशेने जाऊन पाहिले. गाडीतील जखमी अवस्थेतील चालक आकाश पाटील याला गाडीतून बाहेर काढून खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जागरूक नागरिकांनी सांगितले की, गेल्या दोन वर्षांपासून या रस्त्याचे काम सुरू आहे.
अर्धवट काम झालेल्या ठिकाणी अपघात होऊ नये म्हणून सुरक्षिततेसाठी सूचना, काही उपाययोजना कंत्राटदाराने करणे गरजेचे असते पण या रस्त्यावर त्या केल्या गेलेल्या नाहीत. अपघात झाल्यानंतर कंत्राटदारने कामगार पाठवून कामाच्या ठिकाणी असलेल्या उघड्या लोखंडी सळई वाकविणे, शेजारीच असलेला कल्वर्टचा खड्डा जेसीबीच्या सहाय्याने माती टाकून बुजविण्यात आला.
कल्याण शीळ रस्त्याच्या कामाविषयी उच्च न्यायलयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्ते संदीप पाटील म्हणाले, सुरवातीला हा रस्ता चार पदरी करण्यात येणार होता, तेव्हा रस्त्याचे काम अर्धवट असल्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. आता या रस्त्याचे सहा पदरीकरण करण्यात येत आहे, तरी अर्धवट कामाचा सिलसिला सुरूच आहे. सरकारी यंत्रणामध्ये समन्वय नसल्याने पुन्हा न्यायालयात धाव घ्यावी लागेल असे वाटते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.