Kalyan Skywalk MNS workers beat up misbehaving migrant hawkers workers mumbai marathi news sakal
मुंबई

Mumbai News : कल्याण स्कायवॉक वर मनसे कार्यकर्त्यांनी उर्मट वर्तन करणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांना दिला दणका

मराठी माणसांचा तसेच भाषेचा अपमान करत या फेरीवाल्यांनी त्या विद्यार्थ्यांस मारहाण केली.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - कल्याण येथे एका विद्यार्थ्यांशी परप्रांतीय फेरीवाल्यांनी वस्तू खरेदीवरून उर्मट वर्तन केले. मराठी माणसांचा तसेच भाषेचा अपमान करत या फेरीवाल्यांनी त्या विद्यार्थ्यांस मारहाण केली. सदर विद्यार्थ्यांने ही बाब कल्याण मधील मनसे पदाधिकाऱ्यांना सांगताच मनसैनिकांनी स्कायवॉक वर जाऊन परप्रांतीय फेरीवाल्यांना मनसे स्टाईलने दणका दाखवत चोप दिला आहे.

वाशिंद मधील एक विध्यार्थी रविवारी कल्याणमधे काही कामानिमित्त रविवारी आला होता. कल्याणवरून पुन्हा जात असताना स्कायवॉक वर एका फेरीवाल्यांकदम त्याने एक वस्तू खरेदी केली. वस्तू थोडी खराब वाटली म्हणून मुलाने ती वस्तू फेरीवाल्यास परत केली. मात्र त्या वस्तूचे पैसे परत मुलास देण्यास फेरीवाल्याने नकार दिला.

तसेच तुम मराठी लोग ऐसे ही होते हो, असे म्हणत विद्यार्थ्याशी हुज्जत घातली. यावर मुलाने मराठी माणूस तसेच मराठी भाषा यावर काही बोलू नका असा दम दिला. तेव्हा विद्यार्थ्यांने माझ्या भाषेवरून जाऊ नको नाहीतर, मी मनसे वाल्यांकडे जाईल असे सांगितले. तेव्हा तिथल्या 3 ते 4 जणांनी त्याला मारहाण केली.

किसको भी लाओ, कोण क्या उखाडता है देखेंगे असे म्हणत मुलास शिवीगाळ केली. नंतर मुलाने कल्याण पूर्वेतील मनसे शाखेत धाव घेत तेथील कार्यकर्त्यांना घडलेला प्रकार सांगितला. मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी स्कायवॉक वर जात तेथील परप्रांतीय फेरीवाल्यांना मनसे स्टाईल ने दणका देत चांगलाच चोप दिला. यानंतर त्या फेरीवाल्यांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

काही दिवसांपूर्वी मुलुंड मध्ये मराठी महिलेला गुजराती समाजातील एका व्यक्तीकडून कार्यालय नाकारण्यात आले होते. याविषयीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. याची दखल मनसे कार्यकर्त्यांनी घेतली आणि त्यांना माफी मागायला लावली. मात्र अशीच घटना कल्याण मध्ये घडली आहे. परप्रांतीय फेरीवाल्यांकडून मराठी तरुणाला मराठी भाषेवरून सुनावत मारहाण केली. त्यामुळे मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि शहरातील मराठी माणसांना दुय्यम वागणूक मिळत आहे हे सिद्ध होतंय. यामुळे आता तरी प्रशासन याकडे लक्ष देईल का व मराठी माणसांवरील अन्याय दूर होईल का याकडे पहावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Report 2025: भारतीयांच्या सरासरी मासिक पगारात ७ वर्षांत फक्त ४,५६५ रुपयांची वाढ! सरकारी आकडेवारी समोर

Pune Murder News : पुण्यात पहाटे खुनाचा थरार! तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या; कुठं घडली घटना?

Latest Marathi News Live Update: गौतमी पाटीलच्या वाहनाचा अपघात प्रकरण, अपघातावेळी चालकाने मद्य प्राशन केले नसल्याचे स्पष्ट

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाचा मुहूर्त ठरला! उद्घाटनानंतर ६० दिवसांत होणार पहिलं उड्डाण; कसं असेल नवं विमानतळ?

Nagpur Fraud: व्यापारी पगारिया यांची १८.३० कोटींनी फसवणूक; करारानंतरही विदेशी कंपनीकडून माल पाठविण्यास टाळाटाळ

SCROLL FOR NEXT