kalyan taloja metro work 1 thousand 877 cr tender issued mumbai marathi news Sakal
मुंबई

Mumbai Metro : कल्याण तळोजा मेट्रो कामास गती; बांधकामासाठी 1 हजार 877 कोटींची निविदा जाहीर

मुंबई मेट्रोच्या ऑरेंज लाईनचा (ठाणे-भिवंडी-कल्याण) हा आगामी विस्तार कल्याण-डोंबिवली-तळोजा मार्ग

शर्मिला वाळुंज

Mumbai News - मुंबई मेट्रोच्या ऑरेंज लाईनचा (ठाणे-भिवंडी-कल्याण) हा आगामी विस्तार कल्याण-डोंबिवली-तळोजा मार्ग आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) कल्याण ते तळोजा या प्रस्तावित मेट्रो मार्गिका साठी कारशेडसाठी जमीन मिळविली असून आता मेट्रोच्या स्थापत्य (डेपो) बांधकामासाठी 1 हजार 877 कोटींची निविदा जाहीर केली आहे.

ही निविदा प्रक्रीया पूर्ण होताच मेट्रोच्या बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. 20 किमी लांबीची मुंबई मेट्रो लाईन 12 किलोमीटर संपूर्णपणे उन्नत असेल आणि त्यात 17 स्थानके असतील. या ऑरेंज लाईन मुळे ठाणे पल्याडची कल्याण, डोंबिवली शहरे थेट भिवंडी, ठाणे, नवी मुंबई, मुंबईशी जोडली जाणार आहेत.

कल्याण डोंबिवली या शहरांना थेट नवी मुंबई, ठाणे आणि मुंबई या महानगरांशी जोडून शहरांतर्गत वाहतूकीचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या कल्याण तळोजा मेट्रो 12 या मार्गिकेच्या प्रत्यक्ष बांधकामाला लवकरच सुरुवात होणार आहे.

एकूण 5 हजार 600 कोटी खर्चातून मेट्रो मार्गाची उभारणी करण्यात येत आहे. या प्रकल्पाचे सर्व्हेक्षणाचे काम गेल्या वर्षात पूर्ण झाले होते. या मार्गिकेच्या कारशेडसाठी 47 हेक्टर जमीन उपलब्ध झाली आहे.

नुकतीच एमएमआरडीएने या मेट्रोच्या स्थापत्य बांधकामासाठी निविदा जाहीर केली आहे. एकूण 1 हजार 877.88 कोटींची ही निविदा असून यात 17 स्थानके आहेत. तसेच मेट्रो 5 आणि मेट्रो कारशेडला जोडणाऱ्या मार्गिकेचे बांधकाम केले जाणार आहे.

मेट्रो 12 च्या उभारणीसाठी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रयत्न केले आहेत. ही निविदा प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर लवकरच या कामास सुरुवात होईल. ऑक्टोबर 2025 पर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघ आणि आसपासच्या भागाला वाहतूकीचे नवे पर्याय उपलब्ध करुन देण्यासाठी पायाभूत सुविधांचे अनेक मोठे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. येत्या दोन ते तीन वर्षात रेल्वे, रस्ते यांसह मेट्रो आणि जल वाहतुकीचे पर्याय येथील प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत.

कल्याण डोंबिवली या शहरांना थेट ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईशी जोडणाऱ्या या कल्याण तळोजा मेट्रो 12 मार्गाच्या कामाला सुरुवात होणार असून या मार्गाच्या उभारणीमुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. ठाणे पल्याडची उपनगरले नवी मुंबई आणि मुंबईला जोडणारा हा प्रकल्प वाहतूक व्यवस्थेसाठी गेम चेंजर ठरणार आहे.

- डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार, कल्याण लोकसभा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

America-Iran War: अमेरिका-इराणचा करार का मोडला? युद्ध पुन्हा पेटणार का? इराणच्या 'एवढ्या' ठिकाणांवर हल्ले

Vasai Heavy Rain : वसईमध्ये अतिवृष्टीचा तिसरा बळी; २२ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

Pune Ring Road : भुयारी मार्ग, एचसीएमटीआर, रिंगरोड प्रकल्पासाठी पुणे वाहतूक समितीची स्थापना; राज्य शासनाकडून निर्णय जाहीर

Rajesh Sharma: प्रभासच्या चित्रपटाच्या सेटवर अपघात! बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते राजेश शर्मांना विषारी कीटकाचा दंश; प्रकृती गंभीर

Pune News : अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुण अभियंत्याच्या कुटुंबाला दिलासा; विमा नसलेल्या ट्रकच्या मालक-चालकाला भरावी लागणार दीड कोटींची भरपाई

SCROLL FOR NEXT