mns mla raju patil kalyan taloja metro esakal
मुंबई

Kalyan Metro: कल्याण शिळ रस्त्यावरील मेट्रोचे काम तातडीने थांबवा, मनसेच्या आमदाराने विधानसभेत वेधले सरकारचे लक्ष

MNS MLA Raju Patil :नव्याने बनवलेला सिमेंट काँक्रीटचा रस्ता खोदून ही झाडे तोडून येथे मेट्रोचे खांब उभारले जात आहेत. यामुळे या कामावर खर्च केलेला निधी हा वाया गेला आहे

शर्मिला वाळुंज

डोंबिवली, ता. 6 - ऐन पावसाळ्याच्या तोंडावर एमएमआरडीएने कल्याण शीळ रोडवरील मेट्रोचे काम हाती घेतले आहे. या रस्त्याचे नुकतेच सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले असून रस्त्याच्या मधोमध दुभाजकांवर झाड देखील लावण्यात आली होती. नव्याने बनवलेला सिमेंट काँक्रीटचा रस्ता खोदून ही झाडे तोडून येथे मेट्रोचे खांब उभारले जात आहेत. यामुळे या कामावर खर्च केलेला निधी हा वाया गेला आहे. तसेच या रस्त्यावर प्रचंड वाहन कोंडी होत असून त्याचा फटका जनतेला बसत आहे. मेट्रोचे हे काम त्वरित थांबविण्यात यावे अशी मागणी कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी विधानसभेत उपस्थित करत सरकारचे याकडे लक्ष वेधले.

कल्याण ग्रामीण विधानसभेत सुरु असलेल्या विकास कामांच्या नियोजन शून्य कामांचा आमदार राजू पाटील यांनी पाढा वाचुन सरकारचे लक्ष वेधले आहे. शासनाच्या यंत्रणांकडून नियोजनाअभावी सुरु असलेल्या कामांमुळे प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने 27 गावांची न्यायालयीन लढाई, रत्स्यांची निकृष्ट दर्जाची काम यांसह मेट्रोचं सुरु असलेले काम, 14 गावातील शासनाच्या नियोजन शून्य कामाचा गोंधळ शुक्रवारी मनसे आमदार राजु पाटील यांनी विधानसभेत मांडून सरकारला जाब विचारला आहे.

केडीएमसी सह ठाणे मनपा क्षेत्रात शासकीय यंत्रणांकडून काम सुरु आहेत. यामध्ये प्रामुख्याने केडीएमसी क्षेत्रातील 27 गावांसाठी अमृत योजनेचं काम सुरू आहे. मनपा आणि एमएमआरडीए यांच्यात समन्वय नसल्याने अनेक ठिकाणी जलवाहिन्या किंवा गटारांच्या कामांसाठी रस्त्यांची केलेली काम पुन्हा उखडण्यात आली आहेत. तर 27 गावांसह 14 गावांच्या प्रश्नावर देखील शासनाकडून ठोस भूमिका घेतली जात नाही. महाविकास आघाडी सरकारच्या कालखंडात 27 गावांची विभागणी सरकारने केली होती. मात्र यामध्ये प्रामुख्याने महसूल देणारी गावच मनपा क्षेत्रात ठेवत बाकी गावांचा समावेश हा स्वतंत्र नगरपालिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे असं न करता 27 गावांची स्वतंत्र स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण करण्याची मागणी आमदार पाटील यांनी विधानसभेत केली आहे.

एमएमआर क्षेत्रात सध्या सर्रास गृहसंकुलांच्या प्रकल्पांची काम सुरु आहे. यामध्ये प्रामुख्याने एमएमआरडीए आणि म्हाडाचा समावेश अधिक आहे. त्यामुळे या परिसरसाठी स्वतंत्र धरणाच्या नियोजनाची मागणी आमदार पाटील यांनी विधानसभेत केली आहे. केडीएमसी क्षेत्रातील अनेक गावांमध्ये सध्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. यामध्ये मोठमोठ्या गृहसंकुलांच्या प्रकल्पांचा देखील समावेश आहे. त्यामुळे या परिसरात भीषण पाणी टंचाईचा सामना सर्वसामान्य नागरिकांना करावा लागत असल्याने नागरिकांची आंदोलन सुरु आहेत. त्यामुळे या अनागोंदी कारभाराला विधानसभेत आमदार पाटील यांनी वाचा फोडली आहे.

कल्याण डोंबिवली मधील 27 गावांच्या विभाजनाचा प्रश्न,14 गावांच्या नवी मुंबई प्रवेशाचा प्रश्न अद्याप देखील प्रलंबित आहे. तर कल्याण शिळ रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहेत. यांसह कल्याण शिळ रस्त्यावर सुरु असलेल्या मेट्रो 12 प्रकल्पामुळे वाहतूक कोंडीत अधिकची भर पडली आहे. त्यामुळे भूसंपादन केलेल्या अन्य जागेवर काम करून, सध्या सुरु असलेलं काम तातडीने थांबवण्याची मागणी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आमदार पाटील यांनी केलेली आहे.

भूमिपुत्रांच्या मोबदल्याचा प्रश्न अधिवेशनात

कल्याण शिळ रस्त्याचे काम भूसंपादन अभावी रखडले आहे. एमएसआरडीसी कडून अजूनही रस्ते बाधितांना मोबदला मिळालेला नाही. रस्त्याचे काम थांबलेले आहेत. त्यामुळे दररोज वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहेत. या रस्ते बाधित भूमिपुत्रांना बाधित रक्कम 300 कोटी 91 लाख 91 हजार 715 रुपये देणं बाकी आहे. ती तातडीने स्थानिक शेतकऱ्यांना देऊन रस्ता पूर्ण करण्यात यावा अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे. यावेळी 27 गाव युवा मोर्चाच्या सुरु असलेल्या आंदोलनाची दखल देखील सरकारला आमदार पाटील यांनी विधानसभेत करून दिली आहे.

जिमखाना रस्ता खोदकाम विधानसभेत

नुकतेच डोंबिवली मधील जिमखाना परिसरात रस्ते काँक्रिटीकरणाचे काम करण्यात आले होते. या रस्त्याचे काम पूर्ण होताच अल्पावधीतच त्याचे खोदकाम देखील करण्यास सुरुवात झाली आहे. या संदर्भात आमदार पाटील यांनी पुछता है डोंबिवलीकर ! या मथळ्याखाली ट्विट देखील करण्यात आले होते. कल्याण डोंबिवली परिसरात गेल्या काही दिवसात हे प्रकार सुरु आहेत. ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचे कारवाई होत नाही. यामुळे रस्त्यांच्या कामांना कोणत्याही प्रकारचा दर्जा राहत नाही. त्यामुळे केडीएमसी सह ठाणे मनपा क्षेत्रातील सर्व विभागातील रस्त्यांच्या कामांचे ऑडिट करण्याची मागणी आमदार राजू पाटील यांनी विधानसभेत केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

Dhule Crime : दारूच्या नशेत पत्नीवर प्राणघातक हल्ला, धुळे कोर्टाने सुनावली ५ वर्षांची शिक्षा

SCROLL FOR NEXT