Leopard Esakal
मुंबई

Leopard : कल्याण जवळील वरप गाव मधील टाटा कंपनीत बिबट्याचा वावर सीसीटीव्हीत कैद

कल्याण जवळील वरप गावांमधील टाटा कंपनीमध्ये काल रात्री एक ते दीडच्या सुमारास बिबट्या वावर असल्याचं कंपनीच्या सीसीटीव्हीत कैद

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - कल्याण जवळील वरप गावांमधील टाटा कंपनीमध्ये काल रात्री एक ते दीडच्या सुमारास बिबट्या वावर असल्याचं कंपनीच्या सीसीटीव्हीत कैद झाले असून, याबाबत कंपनीच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून वन विभाग अधिकाऱ्याला माहिती देण्यात आली. सध्या वन विभाग अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल होत बिबट्याचा शोध सुरू केला आहे. मात्र रात्रीच्या वेळेला बंद असलेल्या कंपनीत बिबट्या आल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कल्याण-मुरबाड रोडवरील वरप गावाच्या मागील बाजूस असलेल्या टाटा पावर हाऊसमध्ये बिबट्याचा वावर आढळून आला आहे. टाटा पावर हाऊस परिसरात बिबट्या फिरताना सीसीटीव्ही कैद झाला असून, या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरल आहे. दरम्यान या घटनेनंतर वन विभागाने हा संपूर्ण परिसर पिंजून काढला मात्र बिबट्याचा शोध लागला नाही. जांभूळ जंगलाचा हा परिसर असून बिबट्या वाट चुकल्याने या भागात आला असावा, असा अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे.

मुरबाड, माळशेज घाटते बारवी घाटापर्यंत विस्तीर्ण जंगल पट्टा आहे. मुबलक पाणी आणि सुरक्षित अधिवास असल्यामुळे मोठी वन्यजीव साखळी या भागात आढळते. वाघ, बिबट्यासारखे हिंस्र प्राण्यांचा वावर देखील आहे. अलिकडे या वन्य प्राण्यांचा वावर मानवी वसतीत वाढला आहे. त्यात बिबट्यांची संख्या मोठी आहे. बिबट्याच्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत तर मानव आणि वन्य प्राण्यांच्या या संघर्षात अनेक बिबट्यांनी जीव गमवावा लागला आहे.

सध्या बिबट्या तेथून निघून गेला असून नागरिकांनी देखील सतर्क रहावे, रात्री अपरात्री एकट्याने फिरू नये. याचबरोबर वनविभागातर्फे वरप गावासह आजूबाजूच्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याच्या जागृतीसाठी बॅनर लावण्यात आले आहेत. वनविभागाचे पथक देखील या परिसरात तैनात करण्यात आले आहे. सध्या या बिबट्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kerala Cabinet: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच केरळ मंत्रिमंडळाची घोषणा! काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना संधी; कुणावर कोणती जबाबदारी?

DC vs RR: आधी वैभव सूर्यवंशी अन् परागची वादळी खेळी अन् मग स्टार्कच्या एका ओव्हरने खेळ पालटला; दिल्लीने राजस्थानला २०० च्या आत रोखलं

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

SCROLL FOR NEXT