vijaya pote and arvind pote sakal
मुंबई

Thane News : कल्याणमध्ये उबाठा गटाला धक्का; महिला संघटक विजया पोटे, माजी नगरसेवक अरविंद पोटे शिंदे सेनेत दाखल

राज्यात मागील दोन वर्षात विविध विकास कामे झाली आहेत, ही विकास कामे पाहूनच पदाधिकारी मूळ शिवसेनेत येत असल्याचे मत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

सकाळ वृत्तसेवा

ठाणे - राज्यात मागील दोन वर्षात विविध विकास कामे झाली आहेत, ही विकास कामे पाहूनच पदाधिकारी मूळ शिवसेनेत येत असल्याचे मत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. तसेच त्यांना घरी बसणारा फेसबुकवरील नेता नको, तर फेस टू फेस बोलणार नेता हवा असा टोला उद्धव ठाकरे यांचे नाव न घेतला लगावला.

ठाण्यातील कोपरी पूर्व येथे चैत्र नवरात्रौत्सव मंडपात गुरुवारी रात्री कल्याण मधील उद्धव सेनेतील कल्याण जिल्हा महिला संघटक विजया पोटे, माजी नगरसेवक अरविंद पोटे हे कल्याणमधील सुमारे १०० पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे सेनेत प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाने कल्याण उद्धव सेनेला मोठा फटका बसला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

शिवसेनेत आजही 80% समाजकारण आणि 20% राजकारण या पद्धतीने काम सुरू आहे. बाळासाहेबांचे विचार त्यांची भूमिका याला यांनी तिलांजली दिली, आपल्या तत्वांशी तडजोड करून महाविकास आघाडीत सोबत गेले, त्यांच्या सोबत असलेले पदाधिकारी आता त्यांना सोडून मूळ शिवसेनेत येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान, तिकडे ८० टक्के समाजकारण आणि २०% राजकारण अ न होता केवळ राजकारणच केले जात होते त्या राजकारणाला कंटाळूनच आम्ही आज मूळ शिवसेनेत प्रवेश करीत आहोत. असे मत कल्याण जिल्हा महिला संघटक विजया पोटे यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : सामनाही गमावला अन् आता BCCIचा कारवाईचा बडगा... हार्दिक पांड्याची दुतर्फा गोची, पुन्हा असं केल्यास बंदी?

स्वरांच्या युगाचा अंत ! आशाताई भोसले अनंतात विलीन, शासकीय इतमामामात पार पडले अंत्यसंस्कार

ICC चा मोठा धमाका! टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी विक्रमी बक्षीस रकमेची घोषणा; IPL लाही टक्कर देत रकमेत १० पट वाढ

Shahajibapu Patil: तर शिवसेनेचे ५-६ आमदार निवडून येतील: शहाजीबापू पाटील, सोलापूरमध्ये तानाजी सावंत यांना लक्ष घालायला सांगा!

IPL 2026 : टीम डेव्हिडची सर्व 'मस्ती' उतरवली; मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात अम्पायरने समाजावूनही ऐकला नाही, आता... Video

SCROLL FOR NEXT