Car Sakal
मुंबई

कल्याण VIRAL VIDEO : प्रेमाचा संशय, कारचालकाने नेले तरुणाला फरफटत

सिग्नल सुटला असता कार चालकाने समोर उभा असलेल्या व्यक्तीला चक्क काही अंतरावर फरफटत नेले.

शर्मिला वाळुंज

सिग्नल सुटला असता कार चालकाने समोर उभा असलेल्या व्यक्तीला चक्क काही अंतरावर फरफटत नेले.

डोंबिवली - सिग्नल काही सेकंदात सुटणार तोच एका कारसमोर (Car) एक बाईकस्वार (Biker) येऊन उभा राहिला. त्याने कारवर मारायला सुरुवात केली तोच लाल सिग्नल ग्रीन झाला आणि कार चालकाने (Driver) तरुणाला (Youth) काही अंतर फरफटत नेले. ही सर्व थरारक घटना कल्याण पश्चिमेतील आधारवाडी चौकात सिग्नलवर घडली असून एका व्यक्तीने ती आपल्या मोबाईल मध्ये कैद करत समाज माध्यमावर व्हायरल केल्याने समोर आली आहे.

आधारवाडी चौकातील सिग्नलवर काही अनुचित प्रकार सुरू असल्याने एका नागरिकाने हा प्रकार मोबाईल मध्ये कैद करण्यास सुरुवात केली. सिग्नल सुटला असता कार चालकाने समोर उभा असलेल्या व्यक्तीला चक्क काही अंतरावर फरफटत नेले. या घटनेचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला.याच दरम्यान वाहतुक पोलिसांनी व्हिडियो च्या आधारे कार शोधून काढत गुन्हा दाखल केला.

प्रवीण चौधरी अस या कारचालकाच नाव आहे. प्रवीण याचे एका तरुणीसोबत प्रेम संबंध असल्याचे संशय त्रिवेशला आहे. नवी मुंबई येथे राहणारा प्रवीण हा या तरुणीला भेटण्यासाठी कल्याणमध्ये आल्याचा संशय त्रिवेशला आला त्याने आधारवाडी चौकात अडवून वाद घातला असता ही घटना घडली. या प्रकरणी वाहतूक पोलिसांनी प्रवीण विरोधात कारवाई केली आहे. त्रिवेश संबंधित तरुणीचा नातेवाईक असल्याचं समजतंय. मात्र, या घटनेबाबत अद्याप पोलिसांकडून सविस्तर माहिती उपलब्ध झालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT