Aditya Thackeray Team eSakal
मुंबई

Mumbai Fire : दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार 5 लाखांची मदत

कमला इमारत आग दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू; मंत्री आदित्य ठाकरेंनी केली घटनास्थळाची पाहणी

सुधीर काकडे

मुंबई : गेल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या वेगवेगळ्या घटनांनंतर आज मुंबईत (Mumbai) पुन्हा एकदा आग लागल्याची घटना घडली आहे. मुंबईच्या ताडदेव परिसरातील नाना चौक भागात असणाऱ्या कमला इमारतीला आग (Kamala Building Fire Incident) लागली. या घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेच्या वतीने या घटनेत जीव गमावलेल्या लोकांच्या नातेवाईकांना 5 लाखांची नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली आहे.

आज सकाळी साडेसातच्या सुमारास कमला इमारतीला आग लागली. आग लागलेली इमारत ही 20 मजल्यांची असून, इमारतीच्या 18 व्या मजल्यावर ही आग लागली होती. घटनास्थळी अग्निशमन दलाचे कर्मचारी पोहचल्यानंतर त्यांनी त्यांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवलं. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि मंत्री आदत्य ठाकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी आदित्य ठाकरेंनी मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loan Waiver Alert: कर्जमाफी की सिबिलवर डाग? ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ योजनेतील OTS नोंदीमुळे ५६ लाख शेतकऱ्यांच्या पतक्षमतेवर संकट

Neeraj Chopra CWG26: नीरज चोप्राने पाकिस्तानी अर्शद नदीमवर कुरघोडी केली, पण ८४ मीटरचे पात्रता अंतर गाठण्यात अपयशी; फायनलमध्ये पोहोचला की नाही?

School Chicken Biryani: शाळकरी मुलांना मिळणार चवदार चिकन बिर्याणी! तामिळनाडू सरकारचा मोठा निर्णय

सलमान खानने विकला कोट्यवधींचा फ्लॅट; तरीही हातात पडला फक्त 'एवढाच' नफा!

Latest Marathi News Live Update : नागपूरमध्ये आज पुन्हा पावसाला सुरुवात

SCROLL FOR NEXT