Javed Akhtar and Kangana Ranaut instagram
मुंबई

मानहानी खटला अन्यत्र वर्ग करा; कंगना राणावत हिचा सत्र न्यायालयात अर्ज

सुनिता महामुनकर

मुंबई : गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी मानहानीप्रकरणी (Defamation case) अभिनेत्री कंगना राणावत (Kangana ranaut) हिच्याविरोधात मुंबईच्या अंधेरी न्यायालयात खटला (Andheri court) दाखल केला आहे. हा खटला अन्य न्यायालयात वर्ग करण्याची मागणी करणारा अर्ज कंगनाने सत्र न्यायालयात (session court) आज केला.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर कंगनाने वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अख्तर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधाने केली होती. याविरोधात अख्तर यांनी कंगनाच्या विरोधात अंधेरी दंडाधिकारी न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. हा खटला अन्य न्यायालयात वर्ग करण्याची मागणी कंगनाने सत्र न्यायालयात केली आहे.

अख्तर यांचा दावा मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात किंवा अन्य न्यायालयात वर्ग करावा, अशी मागणी तिने केली आहे. यापूर्वी तिने केलेला अर्ज मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने नामंजूर केला आहे. त्यामुळे हा खटला अंधेरी न्यायालयात चालणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Closed: सलग 5 दिवस बँका बंद? SBIने दिली अपडेट; सॅलरी-पेन्शन खात्यांसाठी सूचना, कोणत्या दिवशी बँका बंद?

IND vs JPN: भारतीय T20I संघ जपानमध्ये पहिल्यांदाच खेळणार! जाणून घ्या संभावित Playing XI अन् कधी व कुठे पाहाणार ऐतिहासिक सामना?

‘महाभारत’चा भीम 'सौरव गुर्जर'वर गंभीर आरोप; महिलेला लग्नाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढलं, पोलिसांनी केली अटक

Radhakrishna Vikhe Patil: दुष्काळावर विखे पाटलांचे मोठे वक्तव्य; ‘५ ऑक्टोबरपर्यंत चित्र स्पष्ट होईल, केंद्र-राज्य मिळून मदतीचा निर्णय’

Marathi News Live Updates : येत्या महिनाभरात मुंबई महानगरपालिकेच्या 800 अभियंत्यांची होणार उचलबांगडी, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT