मुंबई

कंगनाला मुंबई पोलिसांची दुसऱ्यांदा नोटीस, १० तारखेला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश

सुमित बागुल

मुंबई : कंगना रानौत आणि तिची बहीण रंगोली रानौतला मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा नोटीस बजावली आहे. कंगना आणि तिच्या बहिणीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणारी वक्तव्ये कंगना रानौतने केलेली होती. त्यानंतर कोर्टाने पोलिसांना कंगनावर गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर कंगनावर गुन्हा नोंदवत तिला चौकशीसाठी बोलावलं होतं.

मात्र, कंगनाच्या घरी तिच्या भावाचं लग्न असल्याचं कारण देत ती व्यस्त असल्याने १५ नोव्हेंबरनंतर चौकशीसाठी येण्याची मुदत मुंबई पोलिसांकडून मागितली होती. कंगनाच्या वकिलांकडून मुंबई पोलिसांना तसा पत्रव्यवहार केल्याची माहिती आहे. दरम्यान आज दुसऱ्यांदा मुंबई पोलिसांकडून कंगनाला आणि तिच्या बहिणीला नोटीस बजावण्यात आलेली आहे. येत्या १० तारखेला कंगनाला आणि तिच्या बहिणीला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी पाचारण केलं आहे. १० तारखेला कंगनाला वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये हजर राहण्यास सांगितले आहे. 

मुंबई पोलिसांनी कंगना रनौत आणि रंगोली रनौतला दुसऱ्यांदा नोटीस बजावलेली आहे. १५६ (३) अंतर्गत कंगनावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गेल्या काळात कंगनाने केलेले ट्विट्स, तिने शेअर केलेले व्हिडीओ त्याचसोबत वांद्रे मेट्रोपॉलिटन मजिस्ट्रेटसमोर करण्यात आलेल्या तक्रारीनंतर तपास करण्यात आला आणि त्यानंतर या सर्वांवर कंगनाकडून उत्तर अपेक्षित आहे. म्हणून कंगनाला समन्स बजावण्यात आलाय.  या प्रकरणात कंगनासोबतच तिची बहीण रंगोली रनौतला देखील समन्स बजावण्यात आला आहे. रंगोलीचंही नाव FIR मध्ये असल्याने तिलाही चौकशीसाठी पाचारण करण्यात आलं आहे.

kangana ranaut gets second notice from mumbai police for enquiry under case of treason

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT