mumbai sakal
मुंबई

कर्जत-खालापूर : जिल्हा परिषदेकडून तालुक्यातील 64 दिव्यांगांना वैयक्तिक लाभ

कर्जत-खालापूर तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या विविध योजनेतुन लाभ

सकाळ वृत्तसेवा

नेरळ : कर्जत-खालापूर (Karjat-Khalapur) तालुक्यातील दिव्यांग (Handicapped) व्यक्तींना शासनाच्या विविध योजनेतुन लाभ मिळावा यासाठी रायगड (Raigad) जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे (Sudhakar Ghare) यांनी केलेले प्रयत्न कामी आले आहेत. रायगड (Raigad) जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत 2020-21 या आर्थिक वर्षात तब्बल 64 लाभार्थींना वैयक्तिक योजनेचा लाभ देण्यात आला आहे.

रायगड जिल्हा परिषदेच्या 2020-21 या आर्थिक वर्षात समाजकल्याण विभागामार्फत कर्जत खालापूर तालुक्यातील जास्तीत जास्त लाभार्थी यांना लाभ मिळावा अशी सूचना कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड यांनी रायगड जिल्हा परिषदेला केली होती.जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि शिक्षण तसेच आरोग्य समितीचे सभापती सुधाकर परशुराम घारे यांनी कर्जत आणि खालापूर तालुक्यातील 64 लाभार्थी यांना वैयक्तिक लाभ मिळवून दिला आहे.वैयक्तिक गटात प्रस्ताव सादर करणाऱ्या सर्व 64 दिव्यांग व्यक्तींना वैयक्तिक शासकीय योजना मंजूरी जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाने दिली आहे. मिळविण्यात आली.त्यामुळे कर्जत खालापूर तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना एवढ्या मोठ्या प्रमाणात वैयक्तिक योजनांचा लाभ मिळणार असल्याने दिव्यांग मिळल्याचे पाहायला मिळाले आहे.

समाजकल्याण विभागाकडून कर्जत तालुक्यातील तब्बल 38 दिव्यांग लाभार्थ्यांना दिव्यांग व्यक्तींना घरघंटीचा लाभ देण्यात आला आहे.तर खलापूर तालुक्यातील तीन लाभार्थी यांना आणि कर्जत तालुक्यातील आठ लाभार्थी अशा 11दिव्यांग लाभार्थी यांना झेरॉक्स मशीन चा लाभ देण्यात आला आहे.

तसेच कर्जत तालुक्यातील 11 दिव्यांग लाभार्थी यांना घरकुल मंजूर झाले असून खालापूर तालुक्यातील एका लाभार्थ्यांला पत्रावळी बनवण्याचे मशीन मंजूर झाले आहे तर खालापूर तालुक्यातील तीन दिव्यांग लाभार्थ्यांना शेवया बनविण्याचे मशीन मंजूर झाले असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : पबवर पहाटे ३ वाजता पोलिसांची धाड, सुरू होता धक्कादायक प्रकार; ८० ते १०० तरुण तरुणी ताब्यात

Satej Patil Dhananjay Mahadik : बंटी पाटील-मुन्ना महाडिक तब्बल १२ वर्षांनी एकत्र; डी. वाय. पाटलांच्या आठवणींना उजाळा, सतेज-संजय पाटील यांचे कौतुक

Indian Air Force Office: पाकच्या ‘हनीट्रॅप’मध्ये हवाई दलाचा अधिकारी; लष्कराची माहिती पाकिस्तानला दिली

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री फडणवीस कोल्हापूर विमानतळावर दाखल

Mahindra 15000 Crore Project: बुटीबोरीत महिंद्राला ८०० एकर जागा; औद्योगिक विकासाला मिळणार चालना; १५ हजार कोटींचा प्रकल्प

SCROLL FOR NEXT