Mumbai Local Train Update Esakal
मुंबई

Mumbai Local Train Update : सकाळी ७ वाजल्यापासून कर्जत-कल्याण लोकल वाहतूक विस्कळीत; चाकरमान्यांचे हाल

सकाळी ऐन गर्दीच्या वेळेत कल्याण कर्जत लोकल सेवा विस्कळीत

अंकिता खाणे (Ankita Khane)

सकाळी ऐन गर्दीच्या वेळेत कल्याण कर्जत लोकल सेवा विस्कळित झाली आहे. कर्जतकडून कल्याणच्या दिशेने जाणारी आणि कल्याणकडून कर्जतकडे जाणारी लोकल सेवा विस्कळित झाली आहे. सकाळी ७ वाजल्यापासुन ही लोकल सेवा विस्कळीत झाली आहे.

भिवपुरीरोड स्टेशनवर स्थानकात अप ट्रॅकवर खड्डा पडला आहे. त्यामुळे पुढील सुचनेपर्यंत संपुर्ण रेल्वे सेवा स्थगित करण्यात आली आहे.

कर्जतवरून सीएसटीकडे निघालेल्या लोकल भिवपुरी स्टेशनवर आल्यानंतर चालकाच्या लक्षात आले की, रेल्वे ट्रॅकवरील खडी बाजुला झाली होती, आणि त्याठिकाणी मोठा खड्डा पडला होता. याची सुचना कर्मचाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर या मार्गावरील अप आणि डाउन या दोन्ही मार्गावर वाहतुक बंद आहे.

ट्रॅकवर पडलेला खड्डा बुजवण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. मात्र ऐन कामाला जाण्याच्या वेळी रेल्वे वाहतुक विस्कळीत झाल्याने चाकरमान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaysingpur Heavy Rain : जयसिंगपुरात ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार; घरांमध्ये पाणी, कोल्हापूर-सांगली महामार्गावर फूटभर पाणी

Manchar News : वादळी वाऱ्यामुळे केळी, मका व आंबा पिकांचे मोठे नुकसान; प्रशासनाला पंचनामे करण्याच्या दिलीप वळसे पाटील यांच्या सूचना

MP Supriya Sule : ‘नरेटिव्ह’ पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई का नाही?

अमरावतीत ट्विस्ट! महायुतीत बंडखोरी करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला, आता रिंगणात चार उमेदवार, नेमकं काय घडतंय?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाकडे शासनाचे दुर्लक्ष; स्मारकासाठी मंजूर केलेला दोन कोटींचा निधी गेला कुठं?

SCROLL FOR NEXT