Uddhav Thackeray 
मुंबई

Karnataka Election Result 2023: भाजपच्या पराभवावर ठाकरेंची जळजळीत प्रतिकिया; म्हणाले, मोदी-शहांच्या...

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला असून काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला असून काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. या निवडणुकीमुळं काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठं उत्साहाचं वातावरण आहे. त्याचबरोबर काँग्रेससोबत असलेल्या भाजपविरोधी पक्षांनाही यामुळं काही प्रमाणात बळ मिळालं आहे. त्यातच शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी या निकालावर भाष्य करताना मोदी-शहांवर जळजळीत टीका केली आहे. (Karnataka Election Result 2023 Uddhav Thackeray reaction on BJP defeat slams on Modi Shah)

सत्तासंघर्षाच्या निकालानंतर मातोश्रीवर ठाकरे गटाच्या आमदारांची बैठक पार पडली. यावेळी आमदारांना मार्गदर्शन करताना त्यांनी कर्नाटकच्या निकालावरही भाष्य केलं. उद्धव ठाकरे म्हणाले, दक्षिण भारत हा आता पूर्णपणे भाजपच्या हातून गेला आहे. देशभरात सुरु असलेल्या फोडाफोडीच्या राजकारण लोकांना आवडलेलं नाही, हे कर्नाटकात दिसून आलं आहे. त्यामुळं भाजपला जनतेनं हद्दपार केलं आहे, त्याचप्रकारे आता महाराष्ट्रातूनही भाजपला हद्दपार करण्याची गरज आहे, असा विश्वासही यावेळी उद्धव ठाकरेंनी दिला. मोदी-शहांच्या हुकुमशाहीचा हा पराभव असल्याची जळजळीत टीकाही यावेळी उद्धव ठाकरे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.

दरम्यान, एका बाजूला कर्नाटक निवडणुकीचे निकाल येत होते तर दुसरीकडं उद्धव ठाकरे पक्षाची मोर्चेबांधणी करत होते. हा निकाल आपल्या बाजूनंच कसा आहे? याचं विश्लेषण उद्धव ठाकरेंनी बैठकीत केलं तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ते पोहोचवावं असे निर्देशही या बैठकीत त्यांनी दिले आहेत.

शिवसेनेच्या बैठकीत जिल्हा प्रमुखांना देखील निमंत्रण देण्यात आलं होतं. कर्नाटकच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडूनही भविष्यातील रणनिती काय असेल यावर चर्चा झाली. १९ जूनला शिवसेनेचे वर्धापन दिन होणार आहे. या वर्धापनदिनाच्या निमित्तानं वेगवेगळे संघटनात्मक कार्यक्रम घ्यावेत, राज्याच्या आर्थिक स्थितीबद्दल भाष्य व्हावं, यासाठी ही बैठक घेण्यात आल्याचं यावेळी आमदार भास्कर जाधव यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, अर्धनग्नावस्थेतला VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT