Karuna_Dhannjay_Eknath 
मुंबई

टायमिंग! धनंजय मुंडेंना शिंदेंचा टोमणा अन् करुणा शर्मा भेटीला

मुख्यमंत्री आणि करुणा शर्मा यांच्यामध्ये काय चर्चा होतेय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा शर्मा या आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी विधानभवनातील कार्यालयात दाखल झाल्या आहेत. पण आजच त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाण्यामागं त्यांनी टायमिंग साधल्याची चर्चा आहे. कारण आजच सभागृहात शिंदे यांनी धनंजय मुंडेंना टोला लगावला होता. (Karuna Sharma going to meeting with CM Eknath Shinde who taunted Dhananjay Munde today)

काहीवेळापूर्वी करुणा शर्मा या विधानभवनात पोहोचल्या. या ठिकाणी त्या मुख्यमंत्री कार्यालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार होत्या. मधल्या काळात मुख्यतः महाविकास आघाडीचं सरकार असताना करुणा शर्मा यांच्यावर विविध गुन्हे दाखल झाले होते. यासंदर्भातील काही मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या होत्या. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्यांना भेटीसाठी वेळ देण्यात आली होती.

करुणा शर्मांनी साधलं टायमिंग

पण करुणा शर्मा यांनी मुख्यमंत्र्यांना भेटण्याचं जे टायमिंग साधलं आहे ते वेगळ्या पद्धतीचं आहे. कारण धनंजय मुंडेंचा एक विषय वेगळ्या पद्धतीनं आज सभागृहात पहायला मिळाला. त्यानंतर आज करुणा शर्मा आणि मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांची ही भेट होत आहे.

धनंजय मुंडेंचा असा घडला किस्सा

धनंजय मुंडे यांना टोला लगावताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'करुणा' या शब्दाचा उल्लेख वेगळ्या पद्धतीनं केला. त्यानंतर सभागृहात अनेक चर्चा सुरु झाल्या. धनंजय मुंडे यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांविरोधात वेगळ्या पद्धतीनं आंदोलन केलं. यामध्ये भाजपच्या मंत्र्यांना कमी महत्वाचं खातं दिल्याबद्दल टोमण्याच्या स्वरुपात सरकारचा निषेध नोंदवला होता. त्यांच्या या घोषणा प्रचंड चर्चेच्या ठरल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या घोषणेचा उल्लेख करताना आज मुख्यमंत्री म्हणाले, "धनंजय मुंडे किती मनापासून घोषणा देत होते. पण त्यावेळी देवेंद्रजींनी तुमच्यावर प्रेम, दया, 'करुणा' दाखवली. पण परत परत ती दाखवता येणार नाही"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Fire: मुंबईत थरार! ४५ मजली भव्य इमारतीत भीषण आग, काही मिनिटांत खळबळ! व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदींच्या अभिनंदन संदेशावर बीएनपीच्या निवडणूक समन्वय समितीचे प्रमुख नझरुल इस्लाम खान यांची प्रतिक्रिया

Jalna News : सरकारी डेटावर डल्ला! आधार, पॅन, गॅस कार्ड, वाहन डिटेल्ससह ई-चालनाची माहिती लिंक; सहा हजार बनावट वेबसाईट सक्रिय

Kolhapur Lake : जुन्या शहराभोवती, व्यवस्था शेतीसाठी; शेतीला पाणी देण्याची पद्धती अनेक शतकाच्या आधीपासूनच अस्तित्वात

Chhatrapati Sambhajinagar News : शिरसाटांचा इगो काही जाईना, म्हणे ‘जंजाळ मुख्यमंत्री होवो’!

SCROLL FOR NEXT