मुंबईत आता बालनाट्याचीही 'सवाई' 
मुंबई

मुंबईत आता बालनाट्याचीही 'सवाई'

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : वेगवेगळ्या स्पर्धेत क्रमांक पटावणाऱ्या एकांकिकांची 'सवाई' स्पर्धा 'चतुरंग'च्या वतीने घेण्यात येते. अशीच बालनाट्य स्पर्धा मुंबईतील 'अष्टगंध' संस्स्थेने बालकलावंतांसाठी आयोजित केली आहे. मराठीतल्या समृद्ध नाट्यकलेची जाणीव नव्या पिढीला व्हावी या हेतूने अष्टगंध कला संस्थेने नाट्यकस्तुरी नावाची एक अभिनव बालएकांकिका स्पर्धा गुरुवार दि. २ जानेवारी, २०२० रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे मुख्य नाट्यगृहात आयोजित केली आहे.

ही बातमी वाचा! बाहुबलीमुळे महिला 'या' दागिन्यांच्या प्रेमात

या स्पर्धेत मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या विभागातल्या २०१९ या वर्षातल्या विविध स्पर्धेत प्रथम व द्वितीय आलेल्या एकूण ६ बालएकांकिका सादर होणार आहेत. सेक्रेड हार्ट, कल्याण यांची बदला, पार्ले टिळक शाळेची जोकर, डी. एस. हायस्कुल सायन यांची गेमओव्हर, उत्कर्ष मंदिर मालाड यांची वारी, शिवसूर्यज्वाला प्रतिष्ठान, ताडदेव यांची कस्तुरी आणि संदेश विद्यालय विक्रोळी यांची बीईंग ग्रीन या एकांकिका सादर होणार आहेत. 

स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट प्रथम एकांकिकेस ७,७७७, द्वितीय एकांकिकेस ५,५५५ तर तृतीय एकांकिकेस ३,३३३ व सन्मानचिन्ह अशी बक्षीसे आहेत. याशिवाय लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजना, वेशभूषा, अभिनय या प्रत्येक विभागात प्रथम, द्वितीय व तृतीय अशी बक्षीसे असणार आहेत. 

नव्या पिढीतील अनेक मुलांना नाट्यचळवळीशी जोडण्यासाठी बोरिवली व परिसरातील अनेक शाळांनी विद्यार्थ्यांना या एकांकिका पाहण्याची संधी द्यावी तसेच पालकांनीही या एकांकिका पाहण्याची संधी आपल्या मुलांना द्यावी असे आवाहन अष्टगंध कला संस्थेने केले आहे. स्पर्धेतील एकांकिका पाहण्यासाठी सर्वांना विनामूल्य प्रवेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Diesel Price: मोठा झटका! पेट्रोलनंतर डिझेलही महागलं; तब्बल २२ रुपयांनी वाढ, जाणून घ्या नवे दर...

प्रवाशांच्या सोयीसाठी मोठा निर्णय! मुंबई लोकलच्या 'या' रेल्वे स्टेशनवर 'स्लीपिंग पॉड्स' सुरू होणार; काही तासांसाठी आरामाची खात्री

देशमुखांच्या घरी असा साजरा होतो गुढी पाडवा; सुनबाई जिनिलियाने सांगितली परंपरा, म्हणाली, 'जेवणाला इतके पदार्थ...

Latest Marathi News Live Update :शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला, अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागा भुईसपाट

अवकाळी पावसाचा करमाडला तडाखा; शेतकऱ्यांचा हाता तोंडाशी आलेला घास हिरावला

SCROLL FOR NEXT