KDMC sakal
मुंबई

KDMC: स्विमिंग पूलमध्ये पोहताना मुलगा जखमी, पालिकेच्या गलथान कारभारला जबाबदार कोण ?

Kalyan: पालिका कर्मचाऱ्यांनी देखील याची तात्काळ दखल घेतली नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dombivali: डोंबिवली क्रिडासंकुलातील केडीएमसीच्या तरण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तन्मय कांबळे (वय 13) याच्या हाताला तरण तलावातील तुटलेली टाईल्स लागून गंभीर दुखापत झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

रविवारी संध्याकाळी हा प्रकार घडला आहे. त्या ठिकाणी प्रथमोपचार बॉक्स व्यवस्थित नव्हता तसेच पालिका कर्मचाऱ्यांनी देखील याची तात्काळ दखल घेतली नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

डोंबिवलीतील गोग्रासवाडी परिसरात राहणारे तन्मय कांबळे आणि शार्दूल हंकारे हे दोघे रविवारी सांयकाळच्या बॅचमध्ये डोंबिवली क्रिडासंकुलातील तरण तलावात पोहण्यासाठी गेले होते. तरण तलावात पोहोत असतानाच तेथील तुटलेल्या टाईल्सचा एक भाग तन्मयच्या डाव्या हाताला लागून जखम झाली.

हाताला गंभीर दुखापत झाल्याचे लक्षात येताच दोघांनीही तरण तलावातून बाहेर येत तेथील पालिका कर्मचारी यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. मात्र त्यांनी तत्परता न दाखवल्याचा आरोप तन्मयने केला आहे.

तेथील प्रथमोपचार बॉक्स देखील व्यवस्थित नसल्याने दोघांनी रिक्षा करून घर गाठले. रविवार असल्याने डॉक्टर उपलब्ध नव्हते. सदर प्रकार तन्मयने पालकांना सांगितल्यानंतर, त्याच्या पालकांनी तरण तलाव येथे धाव घेऊन पालिकेच्या कर्मचा-यांना जाब विचारला. पालिकेच्या गलथान कारभाराविषयी संताप व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : एका सक्षम पथकाची नियुक्ती केली आहे आणि सखोल चौकशी सुरू आहे - अहिर

SCROLL FOR NEXT