doctor corona infected sakal media
मुंबई

कल्याण- डोंबिवलीत डॉक्टरला कोरोनाची लागण; लसीकरणही झाले होते पूर्ण

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका (kdmc) हद्दीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांचा (corona patients) आकडा वाढू लागला आहे. दोन दिवसांपासून कोरोना रुग्ण बाधित रुग्णांचा आकडा हा 200 च्यावर गेला आहे. त्यातच कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य विभागातील एका डॉक्टरला कोरोनाची लागण (doctor corona infected) झाली आहे. या डॉक्टरने लसीचे दोन डोस (two dose vaccination) घेतले आहेत. लसीकरण पूर्ण झालेले असतानाही त्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. (KDMC doctor corona infected even after taking two dose of vaccination)

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कल्याण मुख्यालयात आरोग्य विभागात काम करणाऱ्या एका डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाली आहे. दोन दिवसांपासून त्यांना हलकीशी लक्षणे असल्याने त्यांनी कोरोना चाचणी करुन घेतली होती. सोमवारी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे. गृह विलगीकरणात ते सध्या असून त्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरु आहेत. त्यांच्या कुटूंबातील त्यांची पत्नी आणि मुलीलाही लक्षणे असून त्यांचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे.

यासोबतच आरोग्य विभागातील आणखी एका डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाल्याची चर्चा सुरु होती. मात्र त्यांच्या नातेवाईंकामधील एका व्यक्तीचा अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने सदर डॉक्टर काही दिवसांसाठी विलगीकरणात होते. त्यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

SCROLL FOR NEXT