road potholes sakal media
मुंबई

रस्त्यांवरील चांद्रभूमी मिटणार ; माणेरे गाव व आजूबाजूचे रस्ते होणार चकाचक

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - कल्याण डोंबिवली महापालिकेत (KDMC) समाविष्ट होऊनही 27 गावांचा विकास (village developments) रखडलेलाच राहिला. गावातील रस्त्यांची अवस्था एवढी बिकट आहे की पावसाळ्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे कल्याण पूर्वेतील माणेरे (kalyan manere) व आजूबाजूच्या गावांना खड्ड्यांचे गाव (potholes on roads) अशी ओळख गेल्या 20 वर्षापासून मिळाली होती. या गावातील रस्त्यांसाठी 27 कोटींचा निधी (27 crore fund) मिळाला असून आता गावातील रस्ते चकाचक होणार आहेत. त्यामुळे माणेरे गावाची खड्ड्यांचे गाव ही ओळख लवकरच पुसली जाणार असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत समाविष्ट होऊनही 27 गावे विकासापासून वंचित आहेत. 27 गावांची स्वतंत्र नगरपरिषद व्हावी यासाठी गावांचा न्यायालयीन लढा सुरू आहे. या लढ्यात गावांचा विकासही रखडला आहे. पाण्याच्या समस्येसोबतच गावातील रस्त्यांची दुरावस्था हा मोठा प्रश्न आहे. पावसाळ्यात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे कल्याण पूर्वेतील माणेरे गाव व आजूबाजूच्या परिसराला खड्ड्यांचे गाव हे नाव पडले. नांदीवली ते माणेरे तसेच माणेरे गाव व उल्हासनगर शहराला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. यामुळे गेले 20 वर्षे येथील गावकरी खड्ड्यांचे गाव हा शिक्का घेऊन वावरत आहेत.

शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विधानसभा क्षेत्रातील रस्त्यांसाठी एमएमआरडीए कडून नुकताच 360 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. यामध्ये माणेरे गावाला जोडणाऱ्या दोन्ही महत्वाच्या रस्त्यांसाठी 27 कोटी निधी मंजूर झाला आहे. निधी मंजूर झाल्याने रस्त्याचे काम आता लवकरच मार्गी लागून गावातील रस्ते चकचकीत होणार आहेत. खड्ड्यांचे गाव अशी मिळालेली गावाची ओळख आता मिटणार असल्याने गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

- कल्याण पूर्व मलंगगड आरटीओ ऑफिस ते म्हसोबा चौक ते माणेरे कमान रस्ता - 10 कोटी

- व्हीनस चौक ते एस एस टी कॉलेज - मोरया नगरी ते नागकन्या मंदिर - वि टी सी ग्राउंड ते श्रीराम चौक व अंतर्गत रस्ते सीसी काम - 17 कोटी

गेल्या 20 वर्षापासून गावातील रस्त्याचे काम रखडले होते ज्यामुळे माणेरे गाव व परिसराला खड्ड्यांचे गाव बोलले जात होते. पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नामुळे व्हीनस चौक ते श्रीराम चौक व नांदीवली तलाव आरटीओ ऑफिस ते माणेरे कमान या रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर झाला असून गावाचा कायापालट होणार आहे। माणेरे, आशेरे, वसार, द्वारली गावातील रस्ते आता चांगले होतील.

विजय भोईर, कल्याण पूर्व सह संपर्क प्रमुख शिवसेना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare Health Update : सुषमा अंधारे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

इराणला अमेरिका देणार नुकसान भरपाई, १० कठोर अटी; ट्रम्पना मान्य, युद्धबंदीच्या चर्चेला तयार

'मी ढसाढसा रडतो...' स्वप्नील जोशी खरं सांगताना म्हणाला...'नाच ग घुमा पाहताना मला इतकं...'

Latest Marathi News Live Update: अमरावतीत फुलांचे दर कोसळले! १५० रुपयांचा गुलाब आता फक्त ५० रुपयांत

UP Treasure: पडक्या घराखाली सापडला खजिना’! लाखोंची नाणी उचलून लहान मुलांनी केला पोबारा, थरारक घटनेचा video viral

SCROLL FOR NEXT