hospital sakal
मुंबई

केईएम रुग्णालयातील पहिली अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सलग १७ तास

‘केईएम’मध्ये हाताचे पंजे निखळलेल्या तरुणावर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

मिलिंद तांबे

मुंबई : अतिशय अवघड शस्त्रक्रिया करताना शल्य विशारदांसह भूलतज्ज्ञांसमोरही मोठे आव्हान असते. मुंबई पालिकेच्या केईएम रुग्णालयात झालेली पहिली अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सलग १७ तास चालली. या वेळी भूलतज्ज्ञांना तहान-भूक विसरून काम करावे लागले. झोपेचा थांगपत्ता नव्हता. थकवा आला असला तरी दाखवता येत नव्हता. घरच्यांच्या शुभेच्छा घेऊन कामगिरी फत्ते करण्यासाठी निघालेले हे योद्ध्ये २४ तासांनंतर दुसऱ्या दिवशी घरी गेले.

परराज्यातून आलेल्या २२ वर्षांच्या तरुणावर अवयव प्रत्यारोपणाची ही शस्त्रक्रिया करण्यात आली. केईएम रुग्णालयात साधारण तीन वर्षांपूर्वी हा विभाग सुरू झाला. या विभागातील ही पहिली शस्त्रक्रिया होती. पीडित तरुणाचे दोन्ही हात ‘क्रशर’मध्ये अडकल्याने पंजे निखळले होते. त्याला उपचारासाठी ‘केईएम’मध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अवयव प्रत्यारोपण करून त्या तरुणाला दुसऱ्या व्यक्तीचे पंजे बसवण्यात येणार होते. अवयवदान करणारा दाता मिळाल्यानंतर ही अवघड शस्त्रक्रिया करण्याचे ठरले. शस्त्रक्रियेसाठी प्लॅस्टिक सर्जरी विभागाच्या प्रमुख डॉ. विनिता पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक नेमण्यात आले.

ही शस्त्रक्रिया १५ ते १८ तास सतत सुरू राहणार असल्याने रुग्णाला भूल देणे हे मोठे आव्हान होते. यासाठी त्या विभागाच्या प्रमुख डॉ. इंद्राणी चिंचोली यांच्या नेतृत्वाखाली दहा डॉक्टरांचे पथक तयार करण्यात आले. त्यात डॉ. इंद्राणी यांच्यासह प्रा. डॉ. श्वेता साळगावकर, डॉ. सुनील चापणे, डॉ. आरती कुलकर्णी यांच्यासह निवासी डॉक्टरांची पथक नेमले गेले. भूलतज्ज्ञांच्या पथकात एकूण दहा डॉक्टरांचा समावेश होता. ११ ऑगस्टला अवयवदान शस्त्रक्रिया करण्याचे ठरले. दुपारी एकच्या सुमारास शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली. प्रश्न १७ तासांचा होता. सर्व भूलतज्ज्ञ तेथे हजर होते. एवढ्या परिश्रमानंतर यश मिळवायचे सर्वांच्या डोक्यात होते. शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि प्रत्येकाने सुटकेचा श्वास सोडला.

रुग्णालयात सव्वाशे भूलतज्ज्ञांचे पथक

‘केईएम’मध्ये त्या दिवशी केवळ एकच नाही, तर इतरही शस्त्रक्रिया होत्या. त्यांचे कामही भूलतज्ज्ञांनी पार पाडले. केईएम हे मुंबईतील सर्वात मोठ्या रुग्णालयांपैकी एक रुग्णालय आहे. देशभरातून अनेक गंभीर रुग्ण मोठ्या शस्त्रक्रियांसाठी इथे येतात. त्यांच्यासाठी १८ ते २० शस्त्रक्रियागारे आहेत. दिवसभरात साधारण ५० हून अधिक शस्त्रक्रिया केल्या जातात. या वेळी रुग्णांना भूल देण्याचे आणि त्यांची भूल उतरण्याचे काम भूलतज्ज्ञांना करावे लागते. यासाठी सव्वाशे भूलतज्ज्ञांचे पथक तैनात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रस्त्याच्या दर्जावरून लोकांनी प्रश्न विचारले, व्हिडीओ शूट करणाऱ्या तरुणाला मंत्र्यांने कानशिलात लगावली; VIDEO VIRAL

Ahilyanagar District Bank : अहिल्यानगर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गुप्त बैठक; सुजय विखेंचा थोरातांना वाकून नमस्कार चर्चेत

रिपोर्टवर ‘नॉर्मल’ लिहिलंय म्हणून खुश होऊ नका! हृदयाच्या आरोग्यासाठी कोलेस्ट्रॉलची आकडेवारी समजून घ्या!

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

Asian Games 2026 : नाशिकच्या सर्वेश कुशारेनं जिंकलं ऐतिहासिक पदक! भारताच्या खात्यात १५ मिनिटांच्या अंतरानं ४ मेडल्स

SCROLL FOR NEXT