kem hospital 
मुंबई

धक्कादायक : केईएमच्या आणखी दोन डॉक्टर्स व एका नर्सला कोरोना

सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः केईएम रूग्णालयात कोरोनावर उपचार करणाऱ्या तीन जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोमवारी रात्री आलेल्या अहवालानुसार, दोन डॉक्टर आणि एक नर्सला कोरोनाची बाधा झाल्याचे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले.

यापूर्वीही केईएम रुग्णालयातील एक डॉक्टर आणि एक नर्स कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर आता पुन्हा दोन डॉक्टर आणि एका नर्सला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे बाधित नर्सला सेव्हन हिल्स रुग्णालयात, तर दोन्ही डॉक्टरांना कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले. 

विशेष म्हणजे बाधित झालेले दोन्ही निवासी डॉक्टर असून ते कोरोनाच्या रूग्णांवर उपचार करत होते. केईएम रूग्णालय प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे डॉक्टरांना कोरोनाची लागण होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पाच दिवसांपूर्वी एका सिनियर डॉक्टरलाही कोरोनाची लागण झाली होती. काल आणि आज सकाळी आलेल्या अहवालानुसार एकूण तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, दोन्ही निवासी डॉक्टरांना कस्तुरबा रूग्णालयात हलवण्यात आले आहे. 

रुग्णालय प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका 26 वर्षीय निवासी डॉक्टर कस्तुरबा रुग्णालयात कोरोनाच्या ड्युटीवर होते. त्यानंतर, केईएममध्ये सुरु करण्यात आलेल्या स्क्रिनींग ओपीडीमध्ये काम करत होते. तर, दुसऱ्या 25 वर्षीय डॉक्टरची ड्यूटी ईएमएस पॅथ लॅबमध्ये होती. आता दोन्ही डॉक्टरांवर कस्तुरबा हाॅस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत असल्याची माहिती ही रूग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, पालिकेच्या रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांसाठी पालिकेने वेगळी व्यवस्था करावी, अशी मागणी मार्डने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aundh Water Crisis: औंधसह परिसरावर पाणीटंचाईचे सावट; येळीव तलाव कोरडा, साठा झपाट्याने कमी होत असल्याने टँकरची मागणी

'माझ्या आईने ओळखलंच नाही' तुंबाडची मंजुळामधील साधूच्या भूमिकेबद्दल मकरंद अनासपुरे म्हणाले...'तेव्हा आईला सुद्धा...'

Health Numerology : 'या' 2 मुलांकाचे लोक घेतात अति टेन्शन! वयापेक्षा जास्त ताण घेतल्याने कमी वयातच जडतात आजार

Latest Marathi News Update : लातूरमध्ये गॅस सिलेंडरसाठी पुन्हा रांगा; ऑनलाइन बुकिंगनंतरही ग्राहकांची फरफट

Police Success Story: खाकीचे स्वप्न साकार झाले... पण वर्दीतील लेकरांना पाहायला वडील नव्हते; साताऱ्यातील जिद्दी तरुणांची यशोगाथा..

SCROLL FOR NEXT