Hospital sakal
मुंबई

Raigad News : केंबुर्लीत २०० खाटांचे रूग्णालय; राज्य शासनाकडून मान्यता

रायगड जिल्ह्यात सुसज्ज आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी महाड तालुक्यातील मौजे केंबुर्ली येथे २०० खाटांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल स्थापन करण्यास राज्य सरकारने जीआरद्वारे मान्यता दिली.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - रायगड जिल्ह्यात सुसज्ज आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी महाड तालुक्यातील मौजे केंबुर्ली येथे २०० खाटांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल स्थापन करण्यास राज्य सरकारने जीआरद्वारे मान्यता दिली आहे. 

भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे ही मागणी केली होती. हे रुग्णालय २५ एकर जागेवर उभारले जाईल. रायगड जिल्ह्यात महाड-पोलादपूर येथे छोटी छोटी आरोग्य केंद्रे उपलब्ध आहेत. मात्र तेथे सुसज्ज यंत्रसामुग्री नसल्याने नागरिकांची गैरसोय होते.

कोकण महामार्गांवर अनेकवेळा मोठे अपघात झाल्यावर जखमींना पनवेल-मुंबई येथे नेऊन उपचार करावे लागतात. वेळेत उपचार न मिळाल्याने अनेक नागरिकांना आपला जीवही गमवावा लागला आहे, असेही दरेकर यांनी दाखवून दिले. 

पोलादपूर येथे उपजिल्हा आरोग्य केंद्र आहे. महाड येथे ट्रामा केअर सेंटर आहे. परंतु तेथे पुरेशी यंत्रणा उपलब्ध नाही, असेही दरेकर यांनी सांगितले होते. त्यानुसार शासनाच्या आरोग्य विभागाकडून रुग्णालयाच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नुकतेच तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आदिलाबाद येथे आले असता दरेकर यांच्या सांगण्यावरून त्यांनी तेथूनच प्रशासनाला सूचना दिल्या आणि याबाबतचा जीआर निघाला. ही माहिती दरेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crop Insurance: दुष्काळ जाहीर झाला! आता पीक विम्याचे पैसे किती मिळणार? रक्कम कशी ठरणार, पाहा संपूर्ण गणित

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर पुन्हा अपघात! थांबलेल्या टँकरला धडकून कारचा चुराडा, एकाचा मृत्यू

Dattatray Bharne Drought Relief : महाराष्ट्रातील दुष्काळावर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे काय म्हणाले? किती टप्प्यात मदत करणार?

पुण्यात पोलिसाने गोळी झाडून घेत आयुष्य संपवलं, PMPLच्या बस डेपोत आढळला मृतदेह; ३ दिवसांपासून होते बेपत्ता

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात मनसे-ठाकरे गटाचा ४ ऑक्टोबरला संयुक्त मोर्चा

SCROLL FOR NEXT