Khalistan  Sakal
मुंबई

Mumbai News : खलिस्तान विरुद्ध वृत्त प्रसारित; वृत्तवाहिनीच्या व्यवस्थापकीय संपादकांना धमकी

खलिस्तानविषयी संपादकीय प्रसारित केल्याच्या निमित्ताने डिजिटल वृत्तवाहिनीच्या व्यवस्थापकीय संपादकांना धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : खलिस्तानविषयी संपादकीय प्रसारित केल्याच्या निमित्ताने डिजिटल वृत्तवाहिनीच्या व्यवस्थापकीय संपादकांना धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी वृत्तवाहिनीने केलेल्या तक्रारीवरून अंधेरीतील एमआयडीसी पोलिसांनी गुरुवारी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला होतो.

पोलीस तपासाअंती गैरसमजातून घटना घडल्याचे उघड झाले आहे. आरोपीने कारणास्तव काही मुद्यावर भाष्य टाळण्याचा सल्ल्याला गैरसमजुतीने धमकी समजल्याचे पोलीस सूत्रांनी माहिती दिली आहे. डिजिटल वृत्तवाहिनी व संकेतस्थळ असलेल्या या वाहिनीच्या उपाध्यक्षांनी याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार केली होती.

वृत्तवाहिनीच्या संपादकांनी बुधवारी 27 सप्टेंबर रोजी ‘खलिस्तान’ या विषयावर संपादकीय प्रसारित केले होते. त्याच दिवशी रात्री वाहिनीच्या कार्यालयात गुरिंदर नावाच्या व्यक्तीने दूरध्वनी केला.

पंजाबमधील चंदिगड येथून बोलत असून आपल्याला वाहिनीच्या व्यवस्थापकीय संपादकाशी बोलायचे असल्याचे त्याने सांगितले. मात्र व्यवस्थापकीय संपादक कार्यालयात नसल्याचे कॉलवर बोलण्याला सांगण्यात आले.

त्यावेळी त्याने संपादकीय बंद करा, हा इशारा म्हणून घ्या, अशी धमकी दिली. त्यानंतर वृत्तवाहिनीच्या व्यवस्थापनाने याप्रकरणी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला होता.पोलीस तपासाअंती गैरसमजातून घटना घडल्याचे उघड झाले आहे. आरोपीने कारणास्तव काही मुद्यावर भाष्य टाळण्याचा सल्ल्याला गैरसमजुतीने धमकी समजल्याचे पोलीस सूत्रांनी माहिती दिली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT