मुंबई

Khardi: अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू; मुंबई नाशिक महामार्गावरची घटना

Latest Maharashtra News : वनपाल राजाराम मांजे यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने शासकीय वाहनातून मृत्युमुखी बिबट्याला पुढील कार्यवाहीसाठी खर्डी वनविभाग येथे नेले.

नरेश जाधव : सकाळ वृत्तसेवा

नरेश जाधव

Latest Marathi News : मुंबई नाशिक महामार्गावर जव्हार फाटा लगत अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला.गुरुवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती विहिगाव वनविभागाच्या सूत्रांकडून मिळाली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कसाराखुर्द गाव हद्दीतील मुंबई नाशिक महामार्गाच्या जव्हार फाटा अलीकडे अंदाजे ४ ते ५ महिन्याच्या नर जातीच्या बिबट्याला अज्ञात वाहनाने सकाळी 10 च्या आसपास धडक दिली.

त्यात त्याचा मृत्यू झाला.याबाबत नाशिकच्या दिशेने निघालेल्या प्रवाशानी विहिगाव वनविभागाला माहिती दिली.त्यांनतर वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.सहाय्यक वनसंरक्षक भाग्यश्री पोले यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी चेतना शिंदे, वनपाल राजाराम मांजे यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने शासकीय वाहनातून मृत्युमुखी बिबट्याला पुढील कार्यवाहीसाठी खर्डी वनविभाग येथे नेले.

कसारा पंचक्रोशीतील विहिगाव वनपरिक्षेत्रात अधून मधून भक्ष्याच्या शोधात बिबट्याचा वावर सुरूच असतो.त्यामुळे गाव वाड्या-वस्त्यांमधील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते.वाढता वावर असल्याने बिबटे सैरभैर होत असून नागरिकांना देखील त्याचा त्रास होत असतो.पाणी तसेच खाद्याच्या शोधात हे बिबटे रात्री अपरात्री फिरत असतात.मुंबई नाशिक महामार्गाच्या जुन्या कसारा घाटात रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाची धडक बसून बिबट्याचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Army New Uniform: भारतीय लष्कराचा मोठा बदल! ८ वर्षांनंतर नवा ड्रेस कोड लागू; ब्रिटिशकालीन परंपरांना रामराम, आर्मीचा 'देसी' लूक चर्चेत

T20 World Cup: पाकिस्तानी खेळाडूंशी हँडशेक करणार का? भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने स्पष्टच दिलं उत्तर

Matheran Toy Train: माथेरानची राणी ४ महिने बंद, नवी सेवा सुरू होणार; मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, कधीपासून आणि का?

Manoj Jarange Support : तुकाराम मुंढेंची बदली कराल तर... मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

Latest Live Updates Marathi: गृह लक्ष्मी' आणि 'गृह ज्योती' यांसारख्या जनहितार्थ असलेल्या गॅरंटी योजना बंद केल्या जाणार नाहीत- शिवकुमार

SCROLL FOR NEXT