Kharkopar-Uran railway line in final stage local run on route in few days mumbai  sakal
मुंबई

Mumbai : खारकोपर- उरण रेल्वे मार्गाचे काम अंतिम टप्य्यात; काही दिवसांत मार्गावर धावणार लोकल

पंतप्रधानच्या हस्ते होणार उदघाटन ?

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अनेक वर्षांपासून रखडलेल्या खारकोपर- उरण रेल्वे मार्गाचे काम अंतिम टप्य्यात आले असून येत्या काही दिवसांत या मार्गावर लोकल धावणार आहे.विशेष म्हणजे खारकोपर-उरण रेल्वे प्रकल्पाचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे उरणमध्ये राहणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

नेरूळ ते उरण मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, अद्यापही ही मार्गिका प्रवाशांसाठी सुरू झालेली नाही. या मार्गिकेचे उदघाटन स्वता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्याचे नियोजन आहे. मात्र, अजूनही पंतप्रधान कार्यालयातून वेळ मिळालेला नाही.

विशेष म्हणजे, नवीन मुंबई येथील मेट्रोसह अन्य विकास कामाचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यासाठी सर्व तयारी सुद्धा सुरु झालेली आहे. या सोबतच खारकोपर-उरण मार्गाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे. तसेच उदघाटन कार्यक्रमाची रेल्वेकडून तयारी सुद्धा करण्यात येत आहे.

खारकोपर- उरण १४.६ किलोमीटर लांबीच्या दुहेरी रेल्वे मार्गिकेच काम पूर्ण झाले आहे. या मार्गावर गव्हाण, रांजणपाडा, न्हावाशेवा, द्रोणागिरी आणि उरण ही पाच रेल्वे स्थानके बांधून पूर्ण झाले आहे. मात्र, स्थानक इमारती छोटे- मोठे प्रवासी सुविधेचा काम अंतिम टप्प्यात आहे. हे कामही येत्या काही दिवसात पूर्ण करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT