water shortage sakal
मुंबई

Water Issue : हंडाभर पाण्यासाठी उन्हातान्हात पायपीट

उन्हाच्या झळा वाढताच खालापूर तालुक्यात अनेक गावांत पाणी समस्या भेडसावू लागली आहे. बीडखुर्द गावातील महिलांना तर हंडाभर पाण्यासाठी उन्हाचे चटके सोसत पायपीट करावी लागत आहे.

सकाळ वृत्तसेवा

उन्हाच्या झळा वाढताच खालापूर तालुक्यात अनेक गावांत पाणी समस्या भेडसावू लागली आहे. बीडखुर्द गावातील महिलांना तर हंडाभर पाण्यासाठी उन्हाचे चटके सोसत पायपीट करावी लागत आहे.

खोपोली - उन्हाच्या झळा वाढताच खालापूर तालुक्यात अनेक गावांत पाणी समस्या भेडसावू लागली आहे. बीडखुर्द गावातील महिलांना तर हंडाभर पाण्यासाठी उन्हाचे चटके सोसत पायपीट करावी लागत आहे. तर कपडे धुण्यासाठी चक्क स्मशानभूमीतील हातपंपाचा आधार घ्‍यावा लागतो. राजकीय नेतेमंडळींकडून केवळ आश्‍वासने देण्यात येतात मात्र पाण्यासाठी वणवण पाचवीला पुजल्‍याचा संताप महिला वर्गाकडून व्यक्‍त होत आहे.

साधारण दोन हजारच्या घरात लोकसंख्या असलेल्‍या बीडखुर्द गावात एप्रिलच्या सुरुवातीपासून तीव्र पाणीटंचाई जाणवू लागल्‍याने पुढील दीड-दोन महिने कसे काढावे, असा प्रश्‍न ग्रामस्‍थांना पडला आहे. पाण्यासाठी प्रशासन, नेते मंडळींकडे पाठपुरावा केला तरी समस्‍याचे निराकरण न झाल्‍याने ग्रामस्‍थ हवालदिल झाले आहेत.

जिल्‍ह्यातील ९८ टक्‍के शाळा-अंगणवाड्यांना नळजोडणी

अलिबाग - रायगड जिल्ह्यातील शाळा व अंगणवाड्यांची पाणी समस्या निकाली काढण्यासाठी नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अनेक शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांना घरातून पाणी आणावे लागते; मात्र आता लहान मुलांना पिण्यायोग्य आणि इतर कामासाठी पाणी शाळेतच उपलब्ध होणार आहे. यासाठी आवश्यक असलेली नळजोडणीचे काम प्रगतिपथावर असून जिल्‍ह्यातील ९८ टक्के शाळा, अंगणवाड्यांमध्ये नळ जोडणी देण्यात आल्याचा दावा जिल्हा परिषदेने केला आहे.

शाळा, अंगणवाड्यांना नळ जोडणी देण्याची मोहीम रायगड जिल्हा परिषद प्रशासनाने जलजीवन योजनेअंतर्गत हाती घेतली आहे. जिल्ह्यात ३ हजार १५८ शाळा असून, १४ मार्चपर्यंत ९८.६७ टक्के म्हणजे ३ हजार ११६ शाळांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला आहे. तर ३ हजार ५३ अंगणवाड्या असून, आतापर्यंत ९८.३३ टक्के म्हणजे ३ हजार २ अंगणवाड्यांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

पाणीटंचाई दूर करण्यासाठी सरकारी योजना जाहीर करण्यात आली आहे; मात्र ती अपूर्णावस्‍थेत असून काम रखडले आहे. प्रशासनाकडून ग्रामस्‍थांची वारंवार दिशाभूल करण्यात येत आहे.

- लवेश कर्णुक, ग्रामस्थ, बीडखुर्द, खालापूर

पाणीटंचाई बीडखुर्द गावातील महिलांच्या पाचवीला पुजली आहे. मार्चअखेरपासूनच महिलांची पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. हंडाभर पाणी भरण्यासाठी तासन्‌तास हातपंपावर उभे राहावे लागत आहे.

- रामदास फावडे, युवा उपाध्यक्ष, खालापूर

शाळा, अंगणवाडी इमारतींना नळ जोडण्याची मोहीम जलजीवन योजनेंतंर्गत हाती घेण्यात आली आहे. ९८ टक्क्यांहून अधिक शाळा व अंगणवाड्यांना नळ कनेक्शन देण्यात आले आहे. उर्वरित ठिकाणी कार्यवाही सुरू असून, तिथे मीनाताई ठाकरे योजनेतून पाऊस पाणी संकलनाद्वारे साठवण टाक्या उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाचा आढावा घेण्यात येत असून लवकरच शंभर टक्‍के काम पूर्ण करणार आहोत.

- डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड, अलिबाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT