Kidney sakal media
मुंबई

उष्म्यामुळे 'किडनी स्टोन' बळावतोय; आठवड्याला ९ ते १० रुग्ण

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : उन्हाळ्याचा कडाका (summer) सुरू झाला आहे आणि या उन्हाळ्यात शरीरातील उष्णतेचे प्रमाणही वाढत असते, त्यामुळे अनेकांना किडनी स्टोन (kidney stone) म्हणजेच मुतखड्याच्या त्रास होण्याची शक्यता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून पोटाचे एक्स-रे (Abdominal x-ray), सोनोग्राफी (sonography) अशा तपासण्या वाढल्या आहेत. यात मुतखड्याने त्रस्त पीडित रुग्णांची संख्या वाढली आहे. आठवड्याला ९ ते १० रुग्ण उपचार घेण्यासाठी येऊ लागले आहेत.

तापमान वाढीचा फटका सर्वांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात अनेकांना मुतखडा होण्याची शक्यता वाढते. मुतखड्याची समस्या स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये अधिक दिसून येते. उन्हाळ्यात शरीरातून घाम मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असल्याने शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. जेवढ्या प्रमाणत शरीराला पाण्याची आवश्‍यकता असते, त्या प्रमाणात शरीराला पाणी मिळत नाही. पाण्याच्या या कमतरतेमुळे मूत्र संग्रहण होऊन मुतखड्याचा धोका वाढतो. लघवीमध्ये कॅल्शियम, युरिक ॲसिड तयार झाल्यानेही किडनी स्टोन तयार होतो.

याशिवाय आहारात तिखट, तळलेले पदार्थ जास्त सेवन केल्यास मुतखडा होण्याची शक्यता बळावते. त्यामुळे पोट दुखीकडे दुर्लक्ष न करता त्यावर त्वरित उपचार करावे. हे उपचार वेळीच न झाल्यास मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका वाढतो, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देतात. मुतखड्याबाबत जागरुकता वाढल्याने तपासणीसाठी येणारे रुग्ण वाढले आहेत. यात मुतखड्याच्या त्रास असलेल्या अनेक रुग्णांना तशी कोणतीही लक्षणे नसतात. मूत्रपिंडात खडे असलेल्या व्यक्तीला लघवी करताना वेदना, जळजळ होणे, लघवीतून रक्त येणे, मळमळ, उलट्या, ओटीपोटात दुखणे, वारंवार लघवी होणे अशी लक्षणे जाणवतात, असे युरोलॉजिस्ट डॉ. नसरीन गीते यांनी सांगितले. काही खडे उपचाराविना निघून जातात तर काही खडे उपचार करून त्वरित काढावे लागतात, असेही त्या म्हणाल्या.

त्रास टाळण्यासाठी उपाय

मूतखड्याचा त्रास टाळण्यासाठी अधिक पाणी पिणे, आहारात बदल, थंड पदार्थांचा आहारात आवर्जून समावेश करणे गरजेचे आहे. याशिवाय नियमित व्यायाम, कार्बोनेटेड, खारट आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे टाळा, यामुळे मुतखडा होण्याचा धोका असल्याचेही डॉ. मून म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT