crime esakal
मुंबई

Mumbai Crime : अपहरण झालेल्या 5 वर्षांच्या चिमुकल्याची आईशी परत भेट

आरोपीने महिलेच्या लहान मुलीला जबरदस्ती आपल्या सोबत नेले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - साडेपाच वर्षांच्या मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी मुंबई पोलिस आणि रेल्वे पोलिसांच्या संयुक्त कारवाईत धावत्या ट्रेनमधून अपहरकर्त्यांला गुरूवारी अटक करण्यात आली आहे. रोतीन घोष असे 35 वर्षीय आरोपी मध्य मुंबईतील कामाठीपुरा येथील रहिवासी आहे. त्याच परिसरात वास्तव्य असलेल्या अपहरण झालेल्या मुलाची आई वास्तव्यास आहे. आरोपी आणि मुलीच्या आईचे नातेसंबंध होते. पण नंतर त्यांच्यात मतभेद झाले.

5 सप्टेंबरला मंगळवारी काही निमित्ताने दोघात परत एकदा वाद झाला. वादानंतर आरोपीने महिलेच्या लहान मुलीला जबरदस्ती आपल्या सोबत नेले. यानंतर मुलीच्या आईने मंगळवारी नागपाडा पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. घोषला पकडण्यासाठी नागपाडा पोलिसांची सहा पथके तयार करण्यात आली होती.आरोपी मुलीसह शहरातून पळून जाण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पोलिसाना माहिती मिळाली.

तांत्रिक विश्लेषणातून घोष नाशिकच्या इगतपुरीजवळ असल्याचे पोलिसांना दिसून आले. तसेच पोलिसांना शालिमार एक्स्प्रेसमधून आरोपी प्रवास करत असल्याचे आढळले. जीआरपीच्या पथकाने शालिमार एक्स्प्रेसमध्ये शिरून ट्रेन बुलढाण्यातील शेगावजवळ असताना घोषला पकडले. त्यानंतर त्याला मुंबईत आणण्यात आले. त्यानंतर अपहरणाच्या गुन्ह्याच्या संदर्भात त्याला नागपाडा पोलिसानी अटक केली. मुंबईत आल्यानंतर मुलीला परत आईच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

Scorpio कारमध्ये माजी सरपंचासह 4 जणांना जिवंत जाळलं; दुमडलेली सीट, रक्तानं माखलेली आगपेटी अन् विटांवर रक्ताचे डाग.., घातपाताचा संशय बळावला!

Kolhapur Crime : शेतात कामासाठी गेलेल्या महिलेवर अतिप्रसंग, शरीरसुखास नकार दिल्याने निर्घृण खून; खिशावरील 'त्या' डागाने उलगडलं धक्कादायक रहस्य

Pune News : पुणे शहरात सिमेंट काँक्रिट उखडले; रस्त्यावर पुन्हा खड्डे

SCROLL FOR NEXT