Mumbai Sakal
मुंबई

चिखल लावलेल्या नंबर प्लेटमुळे अपहरणकर्ते जेरबंद

सुटकेसाठी २५ लाखांची खंडणी; खोपोली पोलिसांकडून मुळशी येथील अपहृताची सुटका

सकाळ वृत्तसेवा

खोपोली : खोपोली (Khopoli) पोलिस (Police) ठाणे अंतर्गत शीळफाटा येथे गस्तीवरील पोलिसांनी एका चारचाकी वाहनाविषयी संशय आल्याने त्यातील व्यक्तींची चौकशी केली. त्यात सहा जणांपैकी एकाचे अपहरण करण्यात आल्याचे उघड झाले. पाच जणांनी मिळून हे कृत्य केले होते व त्याच्याकडे खंडणी मागितल्याचे उघड झाले.

पोलिसांनी तातडीने पाच जणांना अटक करून अपहृत व्यक्तीची सुटका केली. गुरुवारी (ता. ३०) रात्री खोपोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हरेश काळसेकर, अंमलदार स्वागत तांबे, राम मासाळ हे गस्तीवर होते. त्याच वेळी एका कारच्या मागील बाजूच्या नंबरप्लेटवर चिखल लावण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्याबाबत संशय आल्याने पोलिसांनी आतील व्यक्तींची चौकशी केली असता कारमधील पाच जणांनी मिळून एका व्यक्तीचे अपहरण केल्याचे स्पष्ट झाले.

अपहृत व्यक्तीने मला वाचवा, असे ओरडल्याने पोलिसांनी सर्वांना कारमधून खाली उतरवले. पोलिस ठाण्यात नेऊन चौकशी सुरू केली असता आरोपींनी गुन्हा कबूल केला. याप्रकरणी वामन मारुती शिंदे (वय ३९), योगेंद्र प्रसाद (२५), दिलीप पासवान (३२), धुरपचंद्र यादव ३३), संदीप सोनावणे (३५) यांना पोलिसांनी अटक केली. हे सर्वजण अंबरनाथमध्ये राहणारे आहेत. या पाच जणांनी मिळून पुणे जिल्ह्यातील मुळशी येथील दिगंबर इंदलसिंग चितोडिया यांचे अपहरण करून त्याला दोन दिवस अंबरनाथमधील एका अज्ञात स्थळी डांबून ठेवले होते.

सुटका करायची झाल्यास २५ लाख रुपये आणून देण्याची मागणी चितोडिया बाकडे केल्याचे स्पष्ट झाले. अधिक तपासात पुण्यातील हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती मिळाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी शंकर, तू माझी पार्वती! स्वयंघोषित धर्मगुरूचा पुण्यातील ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार; पीडितेचे गंभीर आरोप

Gas Cylinder Shortage : हॉटेलांसह अनेक चहा-वडापाव स्टॉलही बंद; व्यावसायिक सिलिंडर पुरवठा ठप्प, लहान-मोठ्या खाद्य व्यवसायांची कोंडी

Sangola Crime : हरवलेल्या १०० महिलांचा लावला शोध; सांगोला पोलिसांची कामगिरी, दहा मुली कुटुंबीयांच्या स्वाधीन

भाजपला एका वर्षात देणगीपोटी मिळाले ६ हजार कोटी, सर्वाधिक कॉर्पोरेट सेक्टरमधून; एकट्या भाजपला काँग्रेससह ४ पक्षांच्या दहापट देणगी

Solapur News : दोन कोटी रुपये खर्चून बेलाटीत उभारणार राम मंदिर; भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण

SCROLL FOR NEXT