pregnant women sakal
मुंबई

Thane News : ‘किलकारी’ घेणार गरोदर मातांची काळजी; २६ हजार ३३३ गर्भवती महिलांना होणार लाभ

महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासावर केंद्र व राज्य शासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत असतात.

सकाळ वृत्तसेवा

ठाणे - महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासावर केंद्र व राज्य शासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. त्यात गर्भवती व प्रसूत महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने शासनाच्या अनेक योजना कार्यान्वित आहेत. अशातच आता, ‘किलकारी’ हि योजना ठाणे जिल्ह्यात देखील राबविण्यात येणार आहे. या योजनेचा जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सुमारे २६ हजार ३३३ गर्भवती महिलांना लाभ होणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली.

शासनाच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागातर्फे गरोदर महिलांच्या व एक वर्षापर्यंतच्या बालकांच्या सुरक्षेसाठी 'किलकारी' ही नवीन योजना आणि आशासेविकांसाठी मोबाईल अकादमी राज्यात सुरू करण्यात येणार आहे. गर्भवती व प्रसूत महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने शासनाच्या अनेक योजना कार्यान्वित करण्यात येतात. किलकारी योजना देशातील १८ राज्यांमध्ये सुरू आहे.

महाराष्ट्रातील २८ लाख नोंदणीकृत गरोदर मातांना योजनेचा लाभ होणार आहे. त्यात ठाणे जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात देखील या योजनेची अंलबजावणी करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलेला गावातील आरोग्यसेविकाद्वारे आर.सी.एच पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. केंद्रीकृत संवादात्मक ध्वनी प्रतिसाद (आयव्हीआर) आधारित मोबाइल आरोग्यसेवा आहे.

गर्भधारणा, बाळंतपण आणि बाल संगोपन विषयक ७२ श्राव्य संदेश थेट कुटुंबांच्या नोंदणीकृत भ्रमणध्वनीवर गर्भधारणेच्या दुसऱ्या तिमाहीपासून मूल एक वर्षाचे होईपर्यंत आई व बाळाचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी मोफत, साप्ताहिक रेकॉर्डेड ऑडियो कॉल करण्यात येतील. ऑडियो कॉल चुकल्यास किंवा त्या आठवड्यातील ऑडियो कॉल पुन्हा ऐकायचा असल्यास नोंदणीकृत १४४२३ या मोबाईल क्रमांकाद्वारे संपर्क करता येणार आहे.

दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात जानेवारी महिन्यातील आकडेवारी पाहता २६ हजार ३३३ गर्भवती महिलांची नोंद आहे. दर महिन्याला हजार पेक्षा जास्त गर्भवतींची नोंद होते. आशा सेविकांच्या कौशल्याला वाव देण्यासाठी मोबाईल अकादमी देखील सुरु करण्यात येणार आहे. तसेच प्रशिक्षण पुर्ण केल्यास व परिक्षा पास झाल्यास आशासेविकांना ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

याद्वारे ठाणे जिल्ह्यातील १ हजार १२३ आशासेविकांना त्यांच्या कामात उपयुक्त ठरणारे ऑनलाइन प्रशिक्षण दिले जाणार आहे. आशासेविका यांच्यासाठी नोंदणीकृत १४४२९ दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच किलकारी सेवा देण्यासाठी येणारा दूरध्वनी क्रमांक ०१२४-४४५१६६० असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Update: LPG कनेक्शनबाबत सरकारची मोठी अपडेट! 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरवर काय निर्णय?

AI आणि रोबोट्समुळे नोकऱ्या धोक्यात! बिल गेट्स यांना चिंता; ‘ह्यूमन रिजर्व्ड’चा फॉर्म्युला सुचवला, आरक्षणाची मागणी

Pancreatic Cancer Breakthrough: कॅन्सर उपचारात महत्त्वाची बातमी! पॅनक्रियाटिक कॅन्सरविरोधात मोठं यश; नव्या औषधाला FDAची मंजुरी

शिवीगाळ करणाऱ्याला श्वेता तिवारीने शिकवला धडा; शोधून काढत लेखी माफीनामा घेतला

Numerology: गर्दीतही वेगळी ओळख! इतर लोकांपेक्षा वेगळा विचार का करतात 'या' मूलांकाचे लोक? ट्रेंड फॉलो करत नाहीत...

SCROLL FOR NEXT