Kiran Mane On salman khan house firing Mumbai Lok Sabha election politics Shivsena UBT Vs BJP marathi news  
मुंबई

Salman Khan : 'डरना जरूरी है!' सलमानच्या घरावर गोळीबारानंतर किरण मानेंना वेगळीच शंका; मुंबईच्या राजकारणावर केलं मोठं भाष्य

Kiran Mane On Salman Khan House Firing : किरण माने यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली असून यामुळे वेगवेगळ्या चर्नांना सुरुवात झाली आहे

रोहित कणसे

Kiran Mane On Salman Khan House Firing : अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घराबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याचा प्रकार समोर आला. या घटनेनंतर एकच खळबळ उडाल्याचे पाहायाला मिळाले. विवारी 15 एप्रिलला झालेल्या या हल्ल्यानंतर प्रशासनाकडून याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. यादरम्यान अभिनेते किरण माने यांनी केलेली सोशल मीडिया पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

किरण माने यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली असून यामुळे वेगवेगळ्या चर्नांना सुरुवात झाली आहे. चित्रपटाच्या स्क्रिप्ट प्रमाणे लिहिण्यात आलेल्या या पोस्टमध्ये राजकीय घडामोडी आणि केंद्रीय तपास यंत्राणांकडून विरोधकांवर होत असलेल्या कारवाईचे संदर्श किरण माने यांनी दिले आहेत.

किरण मानेंनी पोस्टमध्ये काय म्हटलंय?

स्क्रीनप्ले...

सिनेमाच्या सुरूवातीला एकामागोमाग एक काही प्रसंग दिसतात

1

सलमान खानला एका पक्षाचा पदाधिकारी भेटतो. मुस्लिम मतदारांना आकर्षित करून घेण्यासाठी पक्ष प्रचार करावा अशी विनंती करतो.

सलमान खान नम्रपणे नकार देतो.

कट टू

सलमान खानच्या घरावर गोळीबार होतो. बिश्नोई 'जय श्रीराम'चा नारा देत घेतो गोळीबाराची जबाबदारी.

-----------

2

शिवसेनेकडून उद्धव ठाकरे लोकप्रिय नेते अमोल किर्तीकर यांची उमेदवारी जाहीर करतात.

कट टू

अमोल किर्तीकरांवर ईडीची धाड पडते.

------------------

3

राष्ट्रवादीकडून शरद पवार धडाडीचे नेते शशिकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर करतात.

कट टू

शशिकांत शिंदेंनी एपीएमसी मार्केटमध्ये घोटाळा केला आहे त्यांची चौकशी व्हावी अशी भाजपाकडून मागणी होते.

---------------

4

पडद्यावर सिनेमाचं टायटल येतं

'डरना जरूरी है !'

---------------------

पुढे एकेक सिन्स तुम्ही वाढवू शकता.

- किरण माने

दरम्यान सलमान खानच्या घराबाहेर गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ तपासला सुरुवात करत आसपासचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी प्रत्यक्षदर्शींची चौकशी केली. या फुटेजमधून गोळीबार करणाऱ्यांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. सूत्रांच्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा हल्लेखोर विशाल उर्फ काळू नावाचा गुंड असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. विशाल हा रोहित गोदारा गँगशी संबंधित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Supply: मुंबईत २२ ते २६ डिसेंबरपर्यंत पाणी संकट! 'या' भागांसाठी बीएमसीकडून महत्त्वाचा इशारा जारी, वाचा यादी...

Latest Marathi News Live Update : लोकांना जागरूक करण्यात आम्ही अपयशी ठरत आहोत - दलवाई

Upcoming IPO : 2026 मध्ये IPO ची लाट! पैसे तयार ठेवा; रिलायन्स जिओ, PhonePe ते Flipkart या 10 मोठ्या IPO वर बाजाराची नजर

Pachora Nagar Panchayat : पाचोरा पालिकेत शिवसेनेचा भगवा; २८ पैकी २२ जागांवर गुलाल, वाघ गटाला मोठा धक्का

Pune House Burglary : कुलूप तोडून सोनं-रोकड चोरी; कात्रज-मांजरीत दोन घरफोडीच्या घटना!

SCROLL FOR NEXT