Kirit Somaiya on BMC Scam e sakal
मुंबई

'आता अनिल परबांचा नंबर आलाय...' सोमय्यांनी शेअर केला 'रिसॉर्ट'चा फोटो

सकाळ डिजिटल टीम

चार राज्यांमध्ये भाजपने मुसंडी मारल्यानंतर महाराष्ट्रातही मविआ सरकार अस्थिर होत असल्याची चर्चा सुरू आहे. यंदा देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्वाची ठरल्याने राज्यातही भाजपचं स्थान भक्कम होत असल्याचं चित्र तयार झालंय. सध्या राज्य सरकारचं अधिवेश अंतिम टप्प्यात आहे. याआधी फडणवीसांनी पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकून स्फोट केला. त्यासंदर्भात सरकारडून अद्याप स्पष्टीकरण आलेलं नाही. (Kirit Somaiya Alleges Anil Parab over corruption in RTO)

त्यातच आता किरीट सोमय्या पुन्हा अॅक्टिव्ह झाले आहेत. यंदा त्यांच्या टार्गेटवर परिहवन मंत्री अनिल परब आहेत. सोमय्यांनी याआधीही अनिल परब आणि त्यांच्याशी संबंधित अधिकाऱ्यांची नावं समोर आणली होती. बजरंग खरमाटे नावाचा आरटीओ अधिकारी परबांचा 'वाझे' आहे, असं सोमय्यांनी म्हटलं होतं. आता सोमय्यांनी आणखी एक ट्वीट करत महाविकास आघाडीतील चौथ्या मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

सोमय्या यांनी रश्मी ठाकरे आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींचे कोकणात अनधित बंगले असल्याचा आरोप केला होता. यासोबत किनारपट्टी भागात अनिल परबांचे बंगले असल्याचं सांगितलं. याचे पुरावे त्यांनी दिले आहेत. सोमय्यांनी ट्वीट करत परबांच्या रिसॉर्टचा फोटो टाकला आहे.

कोकणातील बेनामी रिसॉर्ट, काळा पैसा आणि अनधिकृत बांधकामांच्या प्रकरणात अनिल परब यांच्याविरोधात केंद्र सरकारने तक्रार दाखल केल्याचं सोमय्यांनी सांगितलं. याची दापोली कोर्टात ३० मार्चला सुनावणी असल्याचं त्यांनी म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'कोणी मिठी मारून रडू लागलं तर कोणी...' संकर्षण कऱ्हाडे चाहत्यांसोबतचा व्हिडिओ शेअर करत म्हणाला...

Akola News: सात गावांना मिळणार वीज; दोन स्वतंत्र कृषी वाहिन्या ,६० किलोमीटर लांबीच्या वीजवाहिनीचा प्रश्न सुटणार; पारद येथे ३३ केव्ही उपकेंद्र कार्यान्वित

Latest Marathi News Live Update : एम. के. स्टॅलिन आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक संपली, नेमकं काय घडलं?

Kaygaon Accident: दीड एकर अद्रक पीक वाचविण्यासाठी तरुणाची धडपड; ट्रॅक्टरसह टँकर विहिरीत कोसळला, नेमकं काय घडलं?

Uddhav Thackeray Health Update : उद्धव ठाकरेंची प्रकृती बिघडली, चेन्नई दौरा रद्द; डिलिमिटेशन विधेयकावरून दिल्ली ते मुंबई राजकीय हालचालींना वेग

SCROLL FOR NEXT