Kirit Somaiya on BMC Scam e sakal
मुंबई

'चला परबांचं रिसॉर्ट तोडूया...', सोमय्यांच्या ट्विटमुळे घडामोडींना वेग

सकाळ डिजिटल टीम

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्याविरोधात मोहीम उघडली आहे. उद्धव ठाकरे यांच्या पत्नीच्या नवे कोकणातील बंगले, अन्य नेत्यांच्या बेनामी मालमत्ता यांचे पुरावे सोमय्यांनी वेळोवेळी देण्याचा प्रयत्न केला. सध्या सोमय्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. (Kirit Somaiya Alleges Anil Parab Over Illegal Resort of Dapoli)

सोमय्यांनी याआधीही अनिल परब आणि त्यांच्याशी संबंधित अधिकाऱ्यांची नावं समोर आणली होती. बजरंग खरमाटे नावाचा आरटीओ अधिकारी परबांचा 'वाझे' आहे, असं सोमय्यांनी म्हटलं होतं. आता सोमय्यांनी आणखी एक ट्वीट करत २६ तारखेला अनिल परबांचं रिसॉर्ट पाडायला जाणार असल्याचं सांगितलं. यासंदर्भात त्यांनी ट्वीट केलं आहे.

सोमय्या यांनी रश्मी ठाकरे आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींचे कोकणात अनधित बंगले असल्याचा आरोप केला होता. यासोबत किनारपट्टी भागात अनिल परबांचे बंगले असल्याचं सांगितलं. याचे पुरावे त्यांनी दिले आहेत. सोमय्यांनी ट्वीट करत परबांच्या रिसॉर्टचा फोटो टाकला होता. आता त्यांनी पुन्हा हा फोटो शेअर करत २६ मार्चला हे रिसॉर्ट तोडणार असल्याचं सांगितलं. कोकणात मार्च काढणार असून परबांचं रिसॉर्ट तोडणार, असं आव्हान त्यांनी दिलंय.

याआधी किरीट सोमय्यांनी ज्या ज्या प्रकरणात पुरावे सादर केले, तसेच ज्या नेत्यांवर आरोप केले त्यांच्यावर केंद्रीय यंत्रणांनी छापे टाकल्याचं दिसतं. त्यामुळे आता सोमय्या रिसॉर्ट तोडनाता शिवसैनिकांचा विरोध होणार का, हे पाहाणंही महत्वाचं असणार आहे.

कोकणातील बेनामी रिसॉर्ट, काळा पैसा आणि अनधिकृत बांधकामांच्या प्रकरणात अनिल परब यांच्याविरोधात केंद्र सरकारने तक्रार दाखल केल्याचं सोमय्यांनी सांगितलं. याची दापोली कोर्टात ३० मार्चला सुनावणी आहे. मात्र, त्याआधीच सोमय्या कोकणात रिसॉर्ट तोडण्यासाठी पोहोचणार असल्याचं समोर आलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

APL 2026: Asian Games मध्ये पदकांची लूट करणारे भारतीय तिरंदाज पुन्हा सज्ज! कधी अन् कुठे पाहाता येणार भारतीय तिरंदाज

MPSC Student Agitation : टिळक चौकातील आंदोलनाकडे नेत्यांची पाठ; उणिवा दुरुस्त करा, पण पद्धत बदलू नका; विद्यार्थ्यांची भूमिका

Latest Marathi News Live Update : राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीसाठी पुण्यात दाखल

Hingoli Fire Tragedy : हिंगोलीत फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग; महिला आणि मुलासह दोघांचा मृत्यू, नगर परिषदेचे कर्मचारी गंभीर भाजले!

Viral Video : 'डोकंच नाहीये काही...' ईशान किशनचा रात्री १ वाजता विमानतळावर पारा चढला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT