Kirit Somaiya Kirit Somaiya
मुंबई

मेलेल्यांचे अंगठे घेऊन जमिनी ट्रान्सफर, सोमय्यांच्या रडारवर धनंजय मुंडे!

सकाळ डिजिटल टीम

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या रडारवर आता नवीन मंत्री आहेत. समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित एका साखर कारखान्यावर सोमय्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. धनंजय मुंडे यांनी मृत व्यक्तीचे अंगठे घेऊन कारखान्यासाठी जमीन बळकावल्याचा आरोप त्यांच्यावर सोमय्यांनी केलाय.

नुकतीच सर्वोच्च न्यायालयात मुंडे यांच्याशी संबंधित जगमित्र साखर कारखान्याची सुनावणी पार पडली. यामध्ये कोर्टाने आश्चर्य व्यक्त केलंय. 2014 साली साखर कारखान्यावर खटला भरण्यात आला होता. त्यानंतर संपूर्ण प्रकरणावर स्टे आला होता.

ठाकरे सरकारचे समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांच्या साखर कारखान्याची चौकशी करण्याचे आदेश दिले पाहिजे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावर आश्चर्य व्यक्त केलं आहे. ज्ञानोबा सिताराम कोळी हे १९८८ मध्ये मृत पावले. राज्य सरकारच्या डेथ सर्टिफिकेवर हीच तारीख आहे. मात्र, त्यांचा अंगठा 2010 साली घेतला आहे. जगमित्र साखर कारखान्यात अफरातफर झाली आहे, असा आरोप सोमय्यांनी केला.

या कोळी यांची जमीन मुंडेंनी 2010 साली विकत घेतली, आणि यावर त्यांचा अंगठा आहे. माणूस सृत पावल्यानंतर हे प्रकरण घडलंय, म्हणजे मोठा घोटाळा झाला आहे, असं सोमय्या म्हणाले. हे सर्व भ्रष्ट शरद पवारांचे शागिर्द असल्याचं त्यांनी म्हटलं. पुढील आठवड्यात या साखर कारखान्यासाठी मुंडे यांनी जमीन कशी बळकावली आहे, याचा खुलासा करण्यासाठी बीडला जाणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

या प्रकरणात एफआय आर दाखल झाली होती. फडणवीस सरकारच्या काळात हे झालं होतं. यानंतर पीडित परिवारातील दोघांनी माझी भेट घेतली. त्यांनी मला जमिनीच्या प्रकरणात अफरातफर झाल्याचं सांगितलं. यामध्ये भ्रष्टाचार झाला असल्याने धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला पाहिजे, असा आग्रह सोमय्यांनी धरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेटचा देव 'सचिन' जेव्हा फुटबॉलचा सुपरस्टार मेस्सीला भेटला, 10 नंबरची जर्सी देताना काळ थांबला… वानखडेवरील 'तो' क्षण Viral

Latest Marathi News Live Update: आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी आज दिल्लीत उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांची भेट घेतली

Baramati Politics:'बारामतीत राष्ट्रवादी व भाजपचे परस्परांवर आरोप प्रत्यारोप'; उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोरील आंदोलनाचे उमटले राजकीय पडसाद..

Google Search : रात्रीच्या वेळेस पुरुष गुगलवर सगळ्यात जास्त काय सर्च करतात? 2025 च्या नव्या रिपोर्टने दुनिया हादरली

Raju Shetti: शक्तीपीठ महामार्ग रेटण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा अटापिटा: राजू शेट्टींचा आरोप; टेंडरसाठी बड्या कंपन्यांकडून घेतला ॲडव्हान्स ?

SCROLL FOR NEXT