Kirit Somaiya  sakal Media
मुंबई

हायकोर्टाच्या दिलाशानंतर सोमय्या आले समोर; CM ठाकरेंवर केले गंभीर आरोप

आयएनएस विक्रांत निधी घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सोमय्या गायब झाले होते.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आयएनएस विक्रांत निधी घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजप नेते किरिट सोमय्या गायब झाले होते. पण मुंबई हायकोर्टानं त्यांना अटकेपासून संरक्षण दिल्यानंतर ते बुधवारी माध्यमांसमोर प्रकट झाले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आपल्याविरोधातील कटाचा मास्टरमाईंड असल्याचा गंभीर आरोप केला. ठाकरे कुटुंबियांचा घोटाळा बाहेर काढत असल्यानंच माझ्यावर सुडबुद्धीनं कारवाई केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. (Kirit Somaiya speaks to media on court order in INS Vikrant fraud)

सोमय्या म्हणाले, "मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्तींचे मी आभार मानतो. त्यांनी मला फक्त दिलासा दिला त्यामुळं नाही तर त्यांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे त्यामुळं. कोर्टानं उपस्थित केलेला प्रश्न मी गेल्या आठ दिवसांपासून उद्धव ठाकरेंना विचारत आहे. सीएमओचं काम फक्त पोलिसांना माफियागिरी करायला लावायची, खोट्या एफआयआर फाईल करायच्या, अटक करुन जेलमध्ये टाकायची भाषा करायची हे होत आहे, महाराष्ट्र पहिल्यांदाच हे सर्व अनुभवत आहे"

आयएनएस विक्रांत प्रकरणात एका दमडीचा घोटाळा आम्ही केलेला नाही. ५८ कोटींची भाषा संजय राऊत यांनी वापरली होती. या आरोपांमध्ये एकही कागद नाही, पुरावा नाही. फक्त स्टंटबाजी करायची. दोन-पाच दिवस मीडियाचं लक्ष वेधून घ्यायचं. पण न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे, आता न्याय मिळायला सुरुवात झाली आहे, असंही सोमय्या यावेळी म्हणाले.

"हे नाटक जे गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरु होतं ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी चालवलं होतं. संजय राऊत हे प्रवक्ते आहेत या कटामागचे मास्टरमाईंड उद्धव ठाकरे आहेत. कारण ठाकरेंच्या मुलांचे आणि पत्नीचे घोटाळे बाहेर यायला लागले. त्यामुळं कसंही करुन किरीट सोमय्यांना जेलमध्ये टाका, त्यांचं तोंड बंद करा हे प्रकार त्यांच्याकडून सुरु झाले. पण मी उद्धव ठाकरेंना सांगतो की, आपले डर्टी डझनचे घोटाळे मी बाहेर काढणार आणि शिक्षा होईपर्यंत किरीट सोमय्या असाच सक्रीय राहणार"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बँकांचा ३ दिवसांचा संप मागे! बैठकीनंतर रात्री उशिरा निर्णय; काय झाली चर्चा?

विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

Divya Shinde Arrest : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची पोलीस कोठडीत रवानगी, डॉक्टरसोबत का झालेला वाद?

Virat Kohli Records: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असा पराक्रम कुणी केला नव्हता, गावस्करांच्या विक्रमाशीही बरोबरी

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत चोरट्यांचा डल्ला; पुण्यात १४ घटनांत ९.७७ लाखांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT