kirit somaiya 
मुंबई

'हातपाय तोडायला सांगितले, त्यामुळे आता राज्यपालांना..' सोमय्या संतापले

ओमकार वाबळे

पुण्याच्या जम्बो कोवीड रुग्णालयाच्या कामात भ्रष्टाचारासंदर्भात महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या पुण्यात आले होते. यावेळी त्यांच्यावर शिवसैनिकांनी आक्रमक होत हल्ला केला. परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्याने सोमय्यांनी माघारी फिरण्याचा निर्णय घेतला.

मात्र, यावेळी पायऱ्यांवरून घसरल्याने त्यांनी दुखापत झाली. सध्या त्यांच्या डाव्या हाताला प्लास्टर आहे. आता सोमय्यांनी मुंबईत पोहोचून आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांचं षडयंत्र असल्याचा आरोप केला असून ते राज्यपाल आणि गृहमंत्र्यांची भेट घेणार आहेत. (Kirit Somaiya attacked bye Shivsena in Pune)

'माझे हातपाय तोडायला सांगितले'

मनसुख हिरेन नंतर किरीट सोमय्यांची हत्या करण्याचा ठाकरे सरकारचा प्लॅन होता. पुण्याच्या घटनेनंतर एक एक व्हिडीओ क्लिप्स समोर आल्या यानंतर हे सत्य समोर आलं आहे. माझे हातपाय तोडायला सांगितले होते. तरीही पुणे पोलीस संथ गतीने तपास करत आहेत. ठाकरेंच्या सरकारमधील घोटाळे बाहेर येणार म्हणून हे घाबरले आहेत. यामध्ये संजय राऊत, अनिल परब यांचा समावेश आहे. त्यामुळे माझ्यावर हल्ला झाला, असं सोमय्या म्हणाले. मोदी सरकारने पुरवलेल्या सुरक्षेमुळे मी वाचलो, असं त्यांनी म्हटलं.

गुन्हा दाखल पण अटक कोणालाही नाही

सोमय्यांवर हल्ला झाल्यानंतर त्याची दखल घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप कोणाला अटक करण्यात आलेलं नाही. पण, पुढील कारवाईसाठी पथके रवाना केल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात प्रशांत लाडे (वय ३०) यांनी तक्रार दिली आहे.

त्यानुसार, भादवी कलम १४३, १४७, १४९, ३४१, ३३६, ३३७, ३२३, ५०४ तसेच मु.पो.अॅक्ट कलम ३७(१) सह १३५ नुसार शहरअध्यक्ष संजय मोरे, पदाधिकारी चंदन साळुंके, किरण साळी, सुरज लोखंडे, आकाश शिंदे, रूपेश पवार, राजेंद्र शिंदे, सनि गवते यांच्यासह ६० ते ७० महिला व पुरूष कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramraje Naik-Nimbalkar: नार्को चाचणी त्यांची त्यांनीच करावी: रामराजे नाईक-निंबाळकर; एकाही घटनेच्या मागे मी आहे, सिद्ध करून दाखवा

तुम्हाला अतिवृष्टीची भरपाई मिळाली नाही का? शेतकऱ्यांनी ‘येथे’ तातडीने काढावा फार्मर आयडी; सोलापूर जिल्ह्यातील ४.९० लाख शेतकऱ्यांना ४९८ कोटींची भरपाई अजूनही मिळाली नाही

७ नोव्हेंबरपासून मुंबईला दररोज विमान! डिसेंबरमध्ये गोव्यालाही सोलापुरातून दररोज विमान; गृह विभागाकडून मिळेना पोलिसांचे मनुष्यबळ, पोलिस ठाण्याचाही प्रस्ताव धुळखात

अग्रलेख : पाणी वाहते झाले...

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात १५ मिनिटांत बनवा ओट्स अन् एग ऑमलेट,सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT